26.6 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeChiplunचिपळूणमध्ये २० वर्षे बिळावर कॅमेरा लावून झाला 'किंगफिशर'चा अभ्यास

चिपळूणमध्ये २० वर्षे बिळावर कॅमेरा लावून झाला ‘किंगफिशर’चा अभ्यास

महाराष्ट्रात सात प्रजातींचे खंड्या पक्षी आढळतात.

चिपळूणमधील पक्षी अभ्यासकांनी तब्बल २० वर्षे सामान्य खंड्या म्हणजेच ‘कॉमन किंगफिशर’ या पक्ष्याच्या घरट्यांचे निरीक्षण करून त्याच्या विणीसंदर्भातील संशोधन निबंध प्रकाशित केला आहे. सामान्य खंड्याच्या विणीविषयीचा हा भारतामधील पहिलाच अभ्यास असून या माध्यमातून प्रथमच देशातील सामान्य खंड्याच्या विणीच्या यशाचा दर ७९ टक्के नोंदविण्यात आला आहे. सोबतच, या पक्ष्याचा प्रजनन हंगाम, अंड्यांची संख्या, अंडी उबवण्याचा काळ यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निरीक्षणे देखील नोंदवण्यात आली आहेत. महाराष्ट्रात सात प्रजातींचे खंड्या पक्षी आढळतात.

त्यांपैकी सामान्य खंड्या या पक्ष्याच्या अधिवासाचा विस्तार जगभरातील मोठ्या भूभागामध्ये आहे. या पक्ष्याच्या जगभरात सात उपप्रजाती आढळतात. त्यांपैकी तीन या भारतात आढळतात. त्यांमधील गोदावरी नदीच्या दक्षिणेपासून खालच्या भूप्रदेशात आढळणाऱ्या या उपप्रजातीच्या विणीचे सखोल संशोधन चिपळूणचे पक्षीअभ्यासक सचिन पालकर आणि प्रणव गोखले यांनी केले आहे. २००४ ते २०२३ या २० वर्षांच्या काळात २६ घरट्यांचे निरीक्षण करून त्यांनी हा संशोधननिबंध प्रकाशित केला आहे.

‘जर्नल ऑफ साऊथ एशियन ऑर्निथोलॉजी’च्या ‘इंडियन बर्ड’च्या २० व्या अंकात हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याबरोबरीनेच २.५ सेंमीच्या सूक्ष्म कॅमेऱ्याचा वापर करून आम्ही घरट्यामध्ये सुरू असणाऱ्या हालचालींचे निरीक्षण केले. घरट्याला कोणत्याही प्रकारे धक्का न पोहोचवता आणि महत्त्वाचे म्हणजे घरट्यात किंवा घरट्याच्या आसपास प्रौढ पक्षी नसतानाच आम्ही घरट्यामध्ये कॅमेरा टाकून निरीक्षणे टिपली. दिवसातून दोनवेळा आम्ही निरीक्षण टिपले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये घरट्यावर सापासारख्या शिकारी जीवांनी केलेले हल्ले देखील टिपण्यात आले आहेत, अशी माहिती पक्षी अभ्यासक सचिन पालकर यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular