22.7 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeMaharashtraसंपाच्या विषयात पुढील सुनावणी २२ डिसेंबरला, कर्मचारी संपावर ठाम

संपाच्या विषयात पुढील सुनावणी २२ डिसेंबरला, कर्मचारी संपावर ठाम

उच्च न्यायालयामध्ये काल २० डिसेंबरला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टानं सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जात असल्याची दखल घेतली. तसेच लोकांना जो विनाकारण त्रास होतोय तो होता कामा नये, अशा शब्दांत संपकरी कर्मचाऱ्यांना फटकारले.

संपाच्या विषयात आज कोणताही निकाल आला नसून, पुढील सुनावणी २२ डिसेंबरला निश्चित करण्यात आली आहे. सुरुवातीला सरकारच्या वकिलांनी त्रिसदस्यीय समितीचा प्राथमिक अहवाल कोर्टापुढे सादर केला. यावेळी कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या विलिनीकरणाऐवजी इतर कोणती पावलं सरकारनं उचलली याबाबत  कोर्टाने माहिती मागितली.

एसटी कर्मचारी संघटना एसटीचा संप मागे घेत आहे, अशी भूमिका अजय गुजर यांनी जाहीर केली असली, तरी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कामगारांनी मात्र आपण विलीनीकरणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. अजय गुजर म्हणाले, “एसटी कर्मचारी तात्पुरते भावनाविवश आहेत. ते लवकरच संप मागे घेतील. आम्ही त्यांना समजावून सांगितल्यावर ते संप मागे घेतील. या कर्मचाऱ्यांना कुणीतरी भडकावत आहे. त्यांना आम्ही व्यवस्थित समजावून सांगू.”

एसटी कर्मचाऱ्यांनी अजय गुजर यांनी आतापर्यंत साथ दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. आपण यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांना आझाद मैदानातून आझाद केले होते, तसेच आता आपण गुजर यांना आझाद करत आहोत,  अशी भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली.

आता आपला लढा हा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली असाच सुरू ठेवू. शेवटी आपण ३०० रुपयांचे वकिलपत्र त्यांच्याकडे दिलेले आहे,  म्हणजेच विलीनीकरणाच्या मागणीसाठी आपण त्यांना ठाम पाठिंबा दिल्याचे एसटी कर्मचारी म्हणाले. आपला लढा हा यापूर्वीही संघटना विरहित होता आणि आताही तो संघटना विरहित असणार आहे. जोपर्यंत अॅड. सदावर्ते आमच्या सोबत आहेत,  तोपर्यंत आम्ही संपातून माघार घेणार नाही, असेही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवले.

RELATED ARTICLES

Most Popular