26.1 C
Ratnagiri
Friday, November 15, 2024

मुंबईत जोरदार राडा, तुफान दगडफेक शिंदे X ठाकरेंचे शिवसैनिक भिडले !

निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच मुंबईत मंगळवारी रात्री...

परशुराम घाटातील वाहतूक धोक्याचीच…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना परशुराम घाट...
HomeChiplunचिपळूणच्या साखळी उपोषणाची शासन दरबारी दखल, साडे सात कोटी निधी मंजूर

चिपळूणच्या साखळी उपोषणाची शासन दरबारी दखल, साडे सात कोटी निधी मंजूर

२२ जुलैला चिपळूणला महापुराने वेढल्यामुळे तेथील अवस्था दयनीय बनली होती. शहरातील महापुराला ४ महिने उलटून गेले तरीही नद्यांमधील गाळ काढणे किंवा नद्यांचे खोलीकरण करणे यासाठी कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही. त्यामुळे गाळ काढण्याचे काम जोमाने सुरू झाले पाहिजे यासाठी चिपळूण बचाव समितीने आंदोलने, जनजागृती व आता साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आ. शेखर निकम यांचा पाठिंबा आहे. आ. निकम व समितीच्या लढ्याला यश आले आहे.

गुरुवारी सकाळी या संदर्भात आ. निकम यांनी ना. पवार यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाशिष्ठीतील गाळ काढण्यासाठी साडेसात कोटी रूपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले. गुरुवारी सकाळी ना. अजित पवार यांनी आ. शेखर निकम यांना बैठकीसाठी बोलाविले. या बैठकीत, हिवाळी अधिवेशनात गाळ काढण्यासाठी साडेसात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले व तातडीने गाळ काढण्यास सुरूवात करा, अशी सूचना केली.

चिपळूण बचाव समितीच्यावतीने गाळ काढण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू ठेवल आहे. अनेक महिला आणि पुरुष यामध्ये सहभागी झाले आहेत. या उपोषणाला विविध संघटना, संस्था, ग्रामपंचायती आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आत्ता शासनाने सुद्धा या उपोषणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे.

चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार प्रमोद जठार चिपळूणात येत आहेत. कोकणातील नेत्यांनी त्याचबरोबर राज्यस्तरीय नेत्यांनीही आता या आंदोलनाची दखल घेतली असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. गाळ उपसा केल्याशिवाय या नद्यांमध्ये पुरेसा पाणी साठा पण होणार नाही आणि पुन्हा हि पूरजन्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी हा गाळ उपसणे महत्वाचे आहे यासाठी हे उपोषण सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular