मी आणि आमचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहोत आणि यापुढेही राहणार आहोत. आज स्पष्टपणे सांगतोय सुरू असलेल्या चर्चा थांबवा. मी आणि माझे सहकारी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही’, अशा निसंदिग्ध शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून पक्षाचे चिन्ह आणि फोटो हटवलेले नाहीत असे सांगताना कपाळावर चिन्ह लावून फिरू का? असा प्रतिसवाल देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.आम्ही आमचे नेते शरद पवार याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहोत आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षाचंच काम करणार. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता निश्चिंत राहावे,’ असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
निरर्थक चर्चा – सध्या सुरू असलेली चर्चा निरर्थक आहे. मी आमदारांची कोणतीही बैठक बोलावलेली नाही. ४० आमदारांच्या एका पत्रावर सह्या घेतल्या हेदेखील खोटे आहे. नेहमीप्रमाणे पान ५ वर मी आज विधीमंडळातील माझ्या कार्यालयात होतो. तेथे नेहमीप्रमाणे भेटण्यासाठी अनेक आमदार आले. त्यांची काही कामे होती. मंगळवारी, बुधवारी आमदारांच्या कमिट्यांची बैठक असते. त्यासाठी ते आले होते. कोणताही वेगळा उद्देश नाही. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. कार्यकर्त्यांनी अशा वावड्यांवर विश्वास ठेवू नये, असेदेखील अजितदादा म्हणाले.
सहनशीलतेचा अंत पाहू नका – सगळ्या चर्चा थांबवा. मीही तुमच्यासारखाच माणूस आहे. त्यामुळे सहनशीलतेचा अंत पाहू नका अशी विनंती मी आपणा सर्वांना करतोय असे अजितदादांनी या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले. त्याचवेळी अजित पवार यांनी आपण आपल्या ट्रिटर फेसबुकच्या कव्हरपेजवरून राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्टपणे संगितले.
कपाळावर चिन्ह लावून फिरू का? – पक्षाचे चिन्ह घड्याळ तसेच शरद पवारांचे फोटो हटवलेले नाहीत असेही सांगितले. मी पुन्हा सांगतो मी पक्षचिन्ह वगैरे काही हटवलेले नाही. आता कपाळावर चिन्ह लावून फिरू का? असा प्रतिसवाल त्यांनी प्रसारमाध्यमांना केला.
ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला आमचं वकीलपत्र दुसऱ्यानं घेण्याचे कारण नाही – तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्या पक्षाबद्दल बोला. आमचं वकीलपत्र दुसऱ्यानं घेण्याचे कारण नाही, अशा संतप्त शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींविषयी भाष्य करणाऱ्या अन्य पक्षांच्या पुढाऱ्यांना अजितदादांनी सुनावले. त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. मात्र त्यांचा इशारा शिवसेना खा. संजय राऊत यांच्याविषयी होता, अशी चर्चा राजकीय . वर्तुळात सुरू झाली आहे. काही बाहेरच्या पक्षातील प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखं झालयं. त्यांना कोणी अधिकार दिला आहे? पक्षाची बैठक होईल तेव्ही मी यावर बोलणार आहे, असे अजितदादा म्हणाले.