25 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeMaharashtraमुंबई-गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी प्रयत्नशील –उपमुख्यमंत्री

मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी प्रयत्नशील –उपमुख्यमंत्री

गोव्याप्रमाणेच त्याहूनही सुंदर सृष्टी सौंदर्य आणि समुद्रकिनारे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याना लाभले आहेत. त्यात चिपी विमानतळामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासात चार चांद लागणार आहेत.

मुंबई–गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था पाहता, लवकरात लवकर या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु करून घेऊन सुस्थितीत आणि वाहतुकीस योग्य असा महामार्ग करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळामुळे जिल्ह्याचा आणि पर्यायाने कोकणचा सर्वांगीण विकास व्हायला हातभार लागणार आहे. त्यामुळे जेवढी चांगली सेवा दिली जाईल तेवढेच विकासाकडे यशस्वी वाटचाल होईल, त्यासाठी कसोसीने प्रयत्न करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन प्रसंगी केले. दरम्यान रत्नागिरी पासून रायगड पर्यंत पुढे जाणारा हायवे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग विमानतळाचा रनवे वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नाम. पवार पुढे म्हणाले, गोव्याप्रमाणेच त्याहूनही सुंदर सृष्टी सौंदर्य आणि समुद्रकिनारे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याना लाभले आहेत. त्यात चिपी विमानतळामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासात चार चांद लागणार आहेत. त्याचा फायदा येथील स्थानिकांना होईल तर चीपी विमानतळ होण्यामागे अनेकांचे योगदान आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन काम केले आहे. त्यामुळे याचे श्रेय कोणा एकट्याला जात नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. तर ज्या प्रमाणे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचे उद्घाटन झाले त्याचप्रमाणे लवकरच या ठिकाणी मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुद्धा लोकार्पण आम्हीच करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान गोव्यात नव्याने आणखीन एक विमानतळ होत आहे. मात्र सिंधुदुर्ग विमानतळाच्या माध्यमातून आपण प्रवाशांना चांगली सेवा दिल्यास, जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणीच विमानातून प्रवास करतील. त्यामुळे येथील एअरपोर्ट प्रशासनाने त्याची काळजी घेऊन त्या दृष्टीने चांगली सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular