25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeEntertainmentअक्षय डाएट विसरून, प्रसिद्ध पुणेरी मिसळीत रममाण

अक्षय डाएट विसरून, प्रसिद्ध पुणेरी मिसळीत रममाण

आज वयाचा ५४ वर्षांचा टप्पा गाठला तरी तो १८ वर्षांच्या तरूणा इतका फिट आहे.

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूपच काटेकोर आहे. त्याच्या झोपण्याच्या वेळा, पहाटे लवकर उठणे, व्यायाम, योगा आणि संतुलित आहार यावर तो विशेष भर देतो. आज वयाचा ५४ वर्षांचा टप्पा गाठला तरी तो १८ वर्षांच्या तरूणा इतका फिट आहे. पण आज तो जरा डायट वगैरे बाजूला सारून चक्क मिसळीवर आडवा हाथ मारताना दिसला आहे.

अक्षय पुण्यातील एका -प्रसिद्ध मिसळीच्या हॉटेलात गेला होता. यावेळी त्याने मिसळ, थालीपीठ आणि मराठमोळ्या पदार्थांवर ताव मारला. यावेळी त्याला पुण्याची मिसळ एवढी भावली कि त्याने लगेचच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. मिसळ खातानाचा एक फोटो शेअर करत अक्षय म्हणतो, ‘प्रत्येक पुणेकरांचा जीव कि प्राण आणि शान असलेला मिसळ पाव.. अशी मिसळ देऊन आमचं पोस्ट आणि मन संतृत्प केल्याबद्दल श्रीमंत मिसळ आणि बरंच काहीचे खूप खूप आभार.. खूप छान.’

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असणारा अभिनेता आहे. गेल्या काही वर्षांपासून अक्षय हा राजकीय, सामाजिक परिस्थितीवर सडेतोडपणे बोलणारा अभिनेता झाला आहे. शिवाय त्याचे बरेच चित्रपट हे सामाजिक आशय घेऊन येतात, त्यामुळे त्याच्या चित्रपटांना कायमच विशेष पसंती मिळते. अक्षयने अॅक्शन, रोमान्स, नाट्य, हॉरर, कॉमेडी, थरारपट सगळ्या प्रकारामध्ये काम केले आहे. तो कोणतेही काम करू शकतो अशी त्याची ख्याती आहे.

विशेष म्हणजे तो स्वतःच्या तब्येतीकडे विशेष लक्ष पुरवतो. पण आज मात्र अक्षयचे काही अनोखे रूपच पाहायला मिळाले म्हटले तर वावगे ठरणार नाही. तो पुण्यामध्ये चक्क मिसळीवर ताव मारताना दिसला आणि पोटभरून त्या पदार्थांचे कौतुक देखील केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular