सध्या खूप चर्चेंत असलेला बिग बजेट तेलगु चित्रपट आरआरआरची सर्वत्र वाहवा होत आहे. या चित्रपटाचं पूर्ण नाव रौद्रम रणम रुधिरम असं आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आरआरआर हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे आलियानं तेलुगूमध्ये पदार्पण केलं आहे. ‘आरआरआर’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, रामचरण, अजय देवगण तसंच आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सोशल मीडियावर प्रेक्षकांनी चित्रपटासंबंधित अनेक पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. अनेक युझर्सनही हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचं म्हटलं आहे. परंतु या चित्रपटाबद्दची मोठी बातमी समोर आली आहे. आलियाचा हा जरी पहिला तेलगु चित्रपट असला तरी, ती दिग्दर्शक राजामौली यांच्यावर नाराज असल्याची बातमी समोर आली आहे.
आलियाच्या नाराजीचं नक्की काय कारण आहे ते आत्ता समोर आले आहे. ते म्हणजे आरआरआरच्या पोस्टरवर जरी आलिया जास्त दिसत असली तरी, प्रत्यक्ष चित्रपटामध्ये मात्र ती फार कमी वेळ स्क्रिनवर दिसते आहे, आणि याच कारणामुळे ती नाराज दिसत आहे. राजामौली यांच्यावरचा राग म्हणून आलियानं यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने चर्चेला उधाण आल आहे.
देशभरातील पाच हजार स्क्रिनवर आरआरआर चित्रपट प्रदर्शित झालाय. उत्तरेत दोन हजार स्क्रिनवर हा चित्रपट दाखवला जातो आहे. भारतात या चित्रपटानं पहिल्या दिवशी १९ कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरामध्ये १७ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाची भारतातील एकूण कमाई ९० कोटींच्या पुढे गेल्याचं समजतं आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी दिग्दर्शक राजामौली यांनी आलियाला दिली मात्र, आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र आलिया प्रचंड दुखावली असल्याचं समोर आले आहे. ती राजामौली यांच्यावर नाराज असल्यानं आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून RRR चित्रपटा संदर्भातील बऱ्याचशा पोस्ट डिलीट केल्या आहेत. केवळ तिच्या अकाऊंटवर तिच्या त्या चित्रपटातील लुक संदर्भातील फोटो ठेवले आहेत.