23.4 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeMaharashtra२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार

२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार

विद्यार्थी आणि पालक यांनी सुद्धा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जाहीर केलल्या निर्बंधांचे पालन करुन लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे,  असे आवाहनही नाम. सामंत यांनी केले आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दि. २० ऑक्टोबर, २०२१ पासून अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ते विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील आणि ज्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी कोविड-१९ ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या  मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. असे नाम. सामंत म्हणाले.

तसेच विद्यापीठ-महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण पूर्ण झाले नसेल तर ते प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. विद्यापीठ, महाविद्यालयांचे वर्ग पूर्णपणे की ५० टक्के क्षमतेने सुरु करावे, याबाबत स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.

कोरोना अजून संपलेला नसून, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येणारी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये ही ज्या आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येतात, त्यांच्याशी कोविड-१९ आजाराबाबत स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती,  प्रतिबंधित क्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन,  विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा आणि महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना/ मानक कार्य प्रणाली देण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

विद्यार्थी आणि पालक यांनी सुद्धा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जाहीर केलल्या निर्बंधांचे पालन करुन लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे,  असे आवाहनही नाम. सामंत यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular