26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeChiplunराजकीय कुस बदलण्याचा इतिहास असलेल्या चिपळूण मतदारसंघाकडे यावेळी सर्वांचे लक्ष

राजकीय कुस बदलण्याचा इतिहास असलेल्या चिपळूण मतदारसंघाकडे यावेळी सर्वांचे लक्ष

मतदारसंघातील जनता पुन्हा वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहे.

भास्कर जाधव आणि सदानंद चव्हाण हे दोन अपवाद वगळता वेळोवेळी राजकीय कुस बदलण्याचा चिपळूण मतदारसंघाचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे यावेळी या मतदारसंघाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे खा. शरद पवार आणि अजित दादा पवार या दोन्ही पक्षाध्यक्षांनी चिपळूणकडे लक्ष घातल्याने यावेळी देखील चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघ नवा इतिहास निर्माण करणार का? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याचे राजकीय केंद्रबिंदू राहिले आहे. येथे घडणाऱ्या घडामोडीचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात देखील उमटत असतात. त्यामुळे चिपळूणकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे राहिले आहे.

चिपळूण मतदारसंघावर नेहमीच समाजवादी विचारांचा पगडा राहिला आहे. येथील जनतेने देखील समाजवादी विचारांची पाठराखण केली आहे. परंतु जहाल विचारांना देखील साथ देऊन वेगवेगळी भूमिका घेण्याचे धाडस देखील येथील जनतेने दाखवलेले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांवर एक प्रकारे जनतेने आपला वचक ठेवल्याचे देखील दिसून आले आहे. पी.के. उर्फ भाई सावंत यांच्यानंतर १९८० साली स्व. राजाराम शिंदे निवडून आले तर १९८५ साली स्व. नाना जोशी काँग्रेसचे आमदार म्हणून विजयी झाले. मात्र १९९० साली या मतदारसंघाने प्रथम राजकीय कुस बदलली आणि शिवसेनेचे बापूसाहेब खेडेकर आमदार झाले. जहाल हिंदुत्ववादी विचारला साथ देण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर मात्र या मतदारसंघात इतिहास घडला.

तरुण आणि आक्रमक नेतृत्व असलेल्या भास्कर जाधव यांना जनतेने सलग दोन वेळा निवडून दिले. स्व. नाना जोशी यांना दुसऱ्या टर्मला पराभव पत्करावा लागला होता. १९९५ साली पुन्हा या मतदारसंघात वेगळाच इतिहास लिहला गेला. भास्कर जाधव अपक्ष उभे ठाकले तर प्रभाकर मोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीकडून रमेश कदम निवडणूक रींगणात होते. यावेळी शिवसेना उमेदवार प्रभाकर मोरे यांचे डिपॉझिट जप्त झाले. कोकणात शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली हा देखील एक वेगळा इतिहास येथील जनतेने लिहला. तर नुकताच उदयास आलेल्या राष्ट्रवादी पक्षाला साथ देऊन राजकीय कुस बदलण्याचा

इतिहास देखील कायम ठेवला. २००९ साली सदानंद चव्हाण यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. विद्यमान आमदार असलेल्या रमेश कदम यांना नाकारून नव्या दमाचे सदानंद चव्हाण यांना साथ देत तब्बल १७ हजाराचे ऐतिहासिक. मताधिक्य देऊन योग्य वेळी येथील जनता राजकीय कुस बदलते हे पुन्हा एकदा दाखवून दिले. पुन्हा २०१४ ला जनतेने सदानंद चव्हाण यांना आमदार म्हणून निवडले. परंतु यावेळी सदानंद चव्हाण यांचे मताधिक्य चक्क ६ हजारावर आले होते. त्यामुळे मतदारसंघातील जनता पुन्हा वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहे.

हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते. शेखर निकम विरुद्ध सदानंद चव्हाण असा थेट सामना झाला होता. ६ हजाराने झालेला पराभव हे पुढील विजयाची दिशा आहे, हे ओळखून शेखर निकम यांनी लगेच कामाला सुरुवात केली आणि २०१९ मध्ये २९ हजाराचे रेकॉर्डब्रेक मताधिक्य घेऊन शेखर निकम चिपळूण संगम `श्वरचे नवे आमदार झाले. दोन वेळा संधी दिलेल्या सदानंद चव्हाण यांना जनतेने त्यावेळी नाकारले होते. तब्बल २९ हजाराचे मताधिक्य हे

चिपळूणच्या राजकीय इतिहासात प्रथमंच घडले होते. त्यामुळे येथील जनता मतदार वेळोवेळी किंवा योग्य वेळी राजकीय कुस बदलून नवीन इतिहास देखील कायम करते हे देखील त्यावेळी स्पष्टपणे दिसून आले. कोणत्याही एका विचारावर, किंवा पक्षावर, वैयक्तिक नेत्यांवर प्रेम न करता आपला योग्य निर्णय योग्यवेळी घेण्याचे धाडस येथील अनेकवेळा दाखवलेले आहे. त्यामुळेच चिपळूण मतदारसंघावर जनतेने आपला वचक कायम ठेवला आहे हे देखील दिसून येत आहे. साहजिकच यावेळी देखील येथील मतदारं इतिहास घडवणार की पुन्हा एक अपवादात्मक भूमिका घेणार हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular