परशुराम घाटात रस्ता बनविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने डोंगर कापल्याने रस्त्यावर दरडी कोसळत आहेत. यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीलाच दरडी कोसळल्या. काही ठिकाणी मातीचा भराव टाकून रस्ता बनविला आहे. त्याच्या बाजूला संरक्षण भिंती बांधल्या आहेत. गुरुवारी पहाटे पावसात मातीचा भराव आणि रस्त्याकडेला बांधलेली संरक्षक भिंत वाहून गेली. रस्त्याखालील मातीचा भरावही वाहून गेला आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथपासून काही अंतरावर पेढे गावची लोकवस्ती आहे.
c. त्यामुळे अनर्थ टळला. रस्ता सिमेंट काँक्रिटचा असल्यामुळे तो तुटला नाही. पहाटेच्या दरम्यान चालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहने नेण्याचे टाळले. सकाळी या घटनेची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाला मिळाल्यानंतर महाड येथील उपअभियंता अमोल माडकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ हा रस्ता बंद करून उजव्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू केली.
राजकीय नेते पोट ठेकेदार – परशुराम घाटात मातीचा भराव टाकून तयार केलेला रस्ता यापूर्वीही खचला आहे. या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे. आता रस्त्याच्या खालील मातीचा भराव वाहून गेल्यानंतर घाटातील रस्ताच धोकादायक बनला आहे. घाटातील डोंगर कटाई, मातीचा भराव टाकणे आणि संरक्षण भिंती बांधण्याचे काम काही राजकीय नेत्यांनी पोट ठेकेदार म्हणून केले. राजकीय नेते आणि कार्यकर्ते हेच पोट ठेकेदार असल्यामुळे लोकप्रतिनिधीही शांत आहेत.