25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRajapurजनावरांची सर्व माहिती एका क्लिकवर, 'ई- गोपाल अॅप

जनावरांची सर्व माहिती एका क्लिकवर, ‘ई- गोपाल अॅप

खरेदी-विक्रीबाबत ई-गोपाल अॅपमध्ये माहिती साठवून ठेवता येणार आहे.

शासन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी नेहमीच प्रयत्न करत असते. शेतीसोबत पशुपालनामधूनही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत असते. पशुपालकांसाठी शासनाने ई-गोपाल अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, जनावर खरेदी-विक्रीची माहिती एका क्लिकवर मिळत आहे. अॅपमध्ये कृत्रिम गर्भधारण पशुंची प्राथमिक चिकित्सा, लसीकरण, उपचार आणि पशुपोषण इत्यादींविषयी माहिती अॅपमधून मिळते. याशिवाय शेतकऱ्यांसाठी शासनाकडून लाभ देण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही मिळणार आहे.

पशुपालकांना आपल्या मालकीचे पशुधन विक्रीसाठी माहिती अपलोड करण्याची सुविधा या अॅपमध्ये आहे. त्यामध्ये जनावरांची जात, वय, दूध उत्पादन, खर्च, पत्ता यांसह विविध माहिती साठवून ठेवता येते. पशुपालकांना सर्व माहिती ऑनलाइन पाहण्याची सुविधा या अॅपमध्ये ठेवण्यात आलेली आहे. पशुपालक हे आपल्याकडे असलेल्या जनावरांची माहिती ठेवत असतो. कोणती जनावरे, किती जनावरे याची माहिती या अॅपवर अपलोड करतो. त्यामुळे जनावरांच्या सर्व नोंदी होतात. जनावरे

खरेदी-विक्रीबाबत ई-गोपाल अॅपमध्ये माहिती साठवून ठेवता येणार आहे. जनावरांच्या मालकाची माहिती यात उपलब्ध असणार आहे तसेच ती माहिती इतर खरेदीदार व्यक्तीला प्राप्त करता येणार आहे. जनावरांचे आजार-उपचार, जनावरांना हंगामानुसार कोणकोणते आजार होतात, त्यावर काय उपाययोजना करायच्या याबाबतची सर्व माहिती अॅपमध्ये उपलब्ध राहणार असल्याने फायदा होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular