29.1 C
Ratnagiri
Wednesday, June 7, 2023

रत्नागिरीच्या समुद्रातून जाताना पकडलेल्या बोटीतील १,८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध निर्यात करत असताना जप्त...

अरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत...
HomeRajapurपोलीस अधिकाऱ्यांनी अन्याय केल्याचा आरोप रिफायनरी विरोधकांनी केली कारवाईची मागणी

पोलीस अधिकाऱ्यांनी अन्याय केल्याचा आरोप रिफायनरी विरोधकांनी केली कारवाईची मागणी

बारसू रिफायनरी प्रकल्प माती परीक्षण काम सुरू असताना पोलीस अधिकाऱ्यांनी बारसू ग्रामस्थांवर अनन्वित अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे केली आहे. तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस महासंचालकांनी आपणाला दिले असल्याचे रिफायनरी विरोधी संघटनेच्या प्रतिनिधींनी पत्रकारांना सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह रिफायनरी विरोधी संघटनेचे एक शिष्टमंडळ पोलीस महासंचालकांना भेटले.

राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे माती परीक्षण करण्यासाठी प्रशासनाने बारसू परिसरात जमाव बंदी लागू करुन आंदोलकांना तालुका, जिल्हा बंदी केली होती. प्रशासनाचा आदेश धुडकावून स्थानिक जनतेने आंदोलन केले होते. आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, असा आरोप अनेक आंदोलकांनी केला आहे. पोलीस महासंचालकांची भेट याबाबत बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकाऱ्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली.

यावेळी पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापराविषयीचे सारे तपशील महासंचालक रजनीश शेठ यांना कथन करण्यात आले. त्याआधारे संबंधितांवर उचित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात एक निवेदनही सादर करण्यात आले असून त्यामध्ये आंदोलकांवर कसे अत्याचार केले याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या शिष्टमंडळात सत्यजित, चव्हाण, नितीन जठार, शामसुंदर नवाळे, संतोष तिर्लोटकर आणि. चंद्रकांत सोड्ये सहभागी झाले होते. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी शिष्टमंडळाचे म्हणने ऐकून घेत तक्रारीची चौकशी करू, असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular