24.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.२२% , बारावीत ११ व्या वर्षीही कोकण अव्वल

रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.२२% , बारावीत ११ व्या वर्षीही कोकण अव्वल

बारावी परीक्षेच्या निकालात सलग ११ व्या वेळी कोकण बोर्डाने बाजी मारली आहे. कोकण बोर्डाचा निकाल ९६.०१ टक्के लागला असून राज्यातील सर्वाधिक निकालाची परंपरा कोकणने कायम राखली आहे. या निकालात मुलींनी बाजी मारली असून कोकणची पोरं हुश्शार हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.२२ टक्के इतका लागला आहे. गुरूवारी बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. यावेळी निकालाची उत्सुकता साऱ्यांनाच होती. अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निकालाची अव्वल स्थानाची परंपरा कोकण बोर्डाने राखली आहे. कोकण बोर्डाचा निकाल ९६.०१ टक्के इतका लागला असून मुलींनी या निकालात बाजी मारली आहे.

सिंधुदुर्ग अव्वल – कोकण बोर्डाअंतर्गत दोन जिल्हे येतात. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार ६९ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १६ हजार २५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.२२ टक्के इतका लागला आहे तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ हजार ९५९ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सिंधुदुर्गचा निकाल हा ९७.५१ टक्के लागला आहे.

६१ केंद्रांवर झाली परीक्षा – कोकण बोर्डात एकूण २५६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात १६६ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील १६६ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ३८ परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षा झाली होती. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ९० कनिष्ठ म हाविद्यालयांसाठी २३ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

वाणिज्य शाखेचा सर्वाधिक निकाल – जाहीर झालेल्या निकालामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल हा ९७.९२ टक्के इतका लागला असून त्यापाठोपाठ टेक्निकल सायन्स शाखेचा निकाल ९६.९३ टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.६१ टक्के, कला शाखेचा निकाल ९२.२७ टक्के, व्यावसायिक शाखा ९५.८९ टक्के इतका निकाल लागला आहे.

दोन्ही जिल्ह्यात मुलींची बाजी – रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ८४८४ मुले तर ८५८५ मुली प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यातील ७९३५ मुले तर ८३१९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ९३.५२ तर मुलींची ९६.९० टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५३८. मुले तर ४४२१ मुली परीक्षेला प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी ‘४३८५ मुले व ४३५१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.६० टक्के तर मुलींची ९७.४१ टक्के इतकी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular