30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

माजी मंत्री बच्चू कडूंचा निवडणूक आयोगासह ईव्हीएमवर हल्लाबोल

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू...

जि. प. आरक्षणाची लॉटरी फुटली! बहुतेक पुढाऱ्यांचे मनोरथ पूर्ण होणार

रत्नागिरी जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोमवारी जाहीर...

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...
HomeRatnagiriआंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक सुरु करण्यासाठी निवेदन

आंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक सुरु करण्यासाठी निवेदन

२२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, रस्ते खचले होते. त्यामुळे साधारण महिनाभर हा घाट डागडुजीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आणि अणुस्कुरा घाटामधून पर्यायी वाहतूक सुरु करण्यात आली होती.

डागडुजीनंतर आंबा घाटातून आता छोट्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु, आंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक बंद असल्याने अवजड वाहनांची वाहतूक अणुस्कुरा घाटातून वळविल्याने  पेट्रोल – डिझेल खर्च वाढला असुन वाहतूक व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. दिवसाला साधारण शंभर एक अवजड गाड्यांची वाहतूक अणुस्कुरा घाटातून होते. तरी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी तात्काळ आंबा घाट सुरू करण्यात यावा,  अशी मागणी रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशनने निवेदनाद्वारे नाम. उदय सामंत आणि खास. विनायक राऊत यांच्याकडे केली आहे.

जिल्हा मोटार मालक असोसिएशनतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी फिनोलेक्स, अल्ट्राटेक, जिंदल कंपनीमधून माल वाहतूक केली जाते साधारण दिवसाला १०० अवजड वाहनांची वाहतूक या मार्गाने होत असते. आंबा घाट जड वाहनांना बंद केल्याने कोल्हापूरमार्गे जाणारी वाहतूक अणुस्कुरा घाटातून करावी लागत आहे. प्रत्येक फेरीला किलोमीटर वाढत असल्याने गाडीच्या इंधन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.

आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी सुरू करावा, याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशनने निवेदनाद्वारे मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांना दिले आहे. लवकरात लवकर हा अवजड वाहनांसाठीचा पर्यायावर मार्ग काढावा अशी विनंती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular