26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriआंबा घाटातील वाहतूक सुरु करण्याबाबत - भाजयुमो द. रत्नागिरी अनिकेत पटवर्धन यांची...

आंबा घाटातील वाहतूक सुरु करण्याबाबत – भाजयुमो द. रत्नागिरी अनिकेत पटवर्धन यांची मागणी

आंबा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे, अतिवृष्टीमुळे रस्ते खचल्याने अवजड वाहतुकीसाठी हा घाट मागील २ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

रत्नागिरी- कोल्हापूर आंबा घाट मार्गे वाहतुकीबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासंदर्भात भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी मागणी केली आहे. रत्नागिरीतून कोल्हापूरला जाण्यासाठी आंबा घाटमार्गे १२५ किमी अंतर पार करून कोल्हापूरला जाता येते. पूर्वी प्रवासाला ३ तास कालावधी लागत होता. आंबा घाटमार्गे एसटीचे तिकीट दर १६० ते १६५ रुपये होते. परंतु अणुस्कुरा घाटमार्गे सध्या २०० ते २३५ रुपये वाढीव तिकीट भाडे आकारले जात आहे. ही भाडेवाढ नियमित ये-जा करणाऱ्या सर्वसामान्याना परवडणारी नाही. परंतु सध्या अणुस्कुरा घाटमार्गे ६० किमीचा जादाचा वळसा पडत असून, घाट मार्ग खराब आणि त्याहून अधिक  धोकादायक असल्याने सुमारे सहा ते सात तास प्रवासाला लागतात.

सोशल मीडियावरून एका राजकीय पक्षाच्या नेत्याने या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण अजून आंदोलन घडून आलेले काही ऐकिवात नाही. अनेक स्थानिक नेत्यांनी जयगड- निवळी रस्त्याच्या झालेल्या चाळणीबाबतही आंदोलनाचा इशारा दिला. पण मुळामध्ये हे रस्त्याचे काम कोणी केले, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली.

आंबा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे, अतिवृष्टीमुळे रस्ते खचल्याने अवजड वाहतुकीसाठी हा घाट मागील २ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या रत्नागिरी- कोल्हापूर घाटमार्गाची वाहतूक  अणुस्कुरा, रायपाटण, पाचलमार्गे वळवण्यात आली आहे. आंबा घाट सद्य स्थितीत किमान सुरु व्हायला दीड महिना तरी लागणार हे प्रशासनाने जाहीर केले आहे. परंतु सद्य स्थितीला अणुस्कुरा घाटही वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून बांधकाम विभागाने हा घाट वाहतुकीस योग्य असल्याचे पत्र द्यावे. एसटीने आंबा घाटातून मिडी बसने वाहतूक चालू करावी. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular