मागील कोरोनाची दोन वर्ष राज्यावर महामारीचे संकट असल्यामुळे सर्वच क्षेत्रात विविध प्रकारचे निर्बंध घालण्यात आले होते. निर्बंधांचा परिणाम नवरात्र उत्सवावर मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे आणि नवीन सरकारने घेतलेल्या नियमामुळे गणेशोत्सव, दहीहंडी आणि आता नवरात्रोत्सव देखील निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.
कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. दहीहंडी, गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करता येणार आहे. नवरात्र उत्सवात कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना आता कोणतेही निर्बंध नसणार आहेत. यंदाचा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात पार पडणार आहे. कोरोना काळात भक्तांना ई पासची सक्ती करण्यात आली होती. यावर्षी मंदिर प्रशासनाकडून ई पासबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ई पासची आवश्यकता नाही. ई पासची सक्ती उठवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
राज्यात दोन वर्षानंतर दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गेले दोन वर्ष राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने या गर्दीला पूर्णविराम लागला होता. यंदा कोरोनाची लाट ओसरल्यामुळे भाविक दर्शनाला अफाट गर्दी करण्याची शक्यता असल्यामुळे, भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
दोन वर्षानंतर प्रथमच दहीहंडी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाल्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. आता दहीहंडी, गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात पार पडणार असल्याने एकप्रकारचे समाधान भाविकांमध्ये पसरले आहे.

