28.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...
HomeRatnagiriआंबडवे येथील मुंबई विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेजसाठीचा निधी तसाच वापराविना पडून

आंबडवे येथील मुंबई विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेजसाठीचा निधी तसाच वापराविना पडून

विद्यापीठ व अधिकाऱ्यांच्या गैरसमजुतीमुळे हे काम चार वर्षे थांबवावे लागले आहे, हि खेदाची बाब आहे

मुंबई विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेजसाठी मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे असलेल्या राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिलेला चार कोटींचा निधी मुंबई विद्यापीठाने खर्च केलेला नाही. आणि ती रक्कम अद्याप मुंबई विद्यापीठाकडे हस्तांतरितही केली आहे, त्यानंतरही काम सुरू झालेले नाही. विद्यापीठ व अधिकाऱ्यांच्या गैरसमजुतीमुळे हे काम चार वर्षे थांबवावे लागले आहे, हि खेदाची बाब आहे,’ अशी नाराजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दापोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

राष्ट्रपती महोदयांना त्यांच्या आंबडवे दौऱ्यात या महाविद्यालयाचे काम सुरू असल्याची अयोग्य माहिती देण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. सामंत म्हणाले की, २०१३ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे गावात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मॉडेल कॉलेज मंजूर केले. मी काल या कॉलेजला भेट देऊन तेथे एक बैठक घेऊन माहिती घेतली.

२०१५ पासून येथील मॉडेल कॉलेजचे बांधकाम बंद आहे. मला सांगताना दुःख होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या या मॉडेल कॉलेजसाठी शासनाने ८ कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यातील ४ कोटी रुपये मुंबई विद्यापीठाकडे हस्तांतरितही करण्यात आले. आणि विद्यापीठाच्या व अधिकाऱ्यांच्या गैरसमजामुळे सुरू झालेले काम हे ४ वर्षे थांबवावे लागले आहे. पुढील १५ दिवसांमध्ये ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे ती, पूर्तता करून हे काम सुरू करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सुरु असलेल्या महाविद्यालयाचे कामकाज पूर्ववत होईल.

RELATED ARTICLES

Most Popular