24.6 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeSindhudurgआंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित, पर्यटक आणि व्यावसायिकांसाठी गुड न्यूज

आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित, पर्यटक आणि व्यावसायिकांसाठी गुड न्यूज

दरवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक आंबोलीला भेट देतात. मात्र गेली दोन अधिक वर्षे आंबोलीच्या पर्यटनाला खीळ बसली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील साधारण दोन वर्षापेक्षा अधिक काळ तळकोकणच्या वर्षा पर्यटनास एक प्रकारे बंदीच आली होती. मात्र,  यंदाच्या वर्षापासून कोरोन बाधितांची संख्या नियंत्रणात आल्याने, पुन्हा  पर्यटन सुरू झाले आहे. आता महाराष्ट्रात झालेल्या काही दिवसांच्या पावसामुळे, आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा रीघ आता आंबोलीच्या धबधब्याकडे वळायला सुरूवात झाली आहे.

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला असल्याने, आंबोलीच पावसाळ्यामध्ये एक मोहक आणि आगळंवेगळंच रूपडे पहायला मिळते. हा मनमोहक धबधबा समुद्र सपाटीपासून सुमारे अडीच हजार फुटांवर वाहत आहे. सुमारे दीडशे ते दोनशे फुटांवरून तो मनमुराद कोसळतो. त्यामुळे फेसळणारे पाणी हे येथील विलक्षण सौंदर्यत भर टाकत असते.

पावसाला सुरुवात झाल्याने सध्या राज्यात सर्वत्र विशेष करून कोकणात येणाऱ्या सर्व मार्गांवर हिरवळ पसरली आहे. डोंगरावरून शुभ्र फेसाळलेले धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे घाटांमध्ये तर दृश्य अतिशय सुंदर डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखे असते.

आंबोलीमध्ये एरव्ही सुद्धा वातावरण एकदम आल्हाददायी असते आणि आता पावसाळ्यामुळे तर वातावरणात कमालीचा गारवा, हिरवीगार वनराई, दाट धुकं, पाऊस, ऊन आणि फेसाळणारे धबधबे हे निसर्गाचं विलक्षण मोहक रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे दरवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक आंबोलीला भेट देतात. मात्र गेली दोन अधिक वर्षे आंबोलीच्या पर्यटनाला खीळ बसली आहे. यात कोरोना महामारी आणि कोसळणाऱ्या दरडीमुळे पर्यटन एक प्रकारे पूर्णत: बंदच करण्यात आले होते. मात्र, आता पावसाची सुरुवात झाल्यापासून आंबोलीत वर्षा पर्यटनाला सुरुवात झाली आहे. पर्यटकांबरोबरच व्यवसायिकांसाठी देखील हि सुखकारक बातमी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular