29.2 C
Ratnagiri
Saturday, June 1, 2024

झाडे न लावणाऱ्या कंपनीला सुनावले – आमदार निकम

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम ते असुडें या दरम्यान...

रत्नागिरीत ७१ इमारती धोकादायक, संबंधितांना नोटीस

पावसापुर्वीच्या तयारीमध्ये रत्नागिरी पालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात...

दापोलीतील गुरुकृपा कात फॅक्टरी सील, चोरीचा खैर साठा सापडला

सांगोला येथील वन विभागाच्या पथकाने विसापूर (ता....
HomeRatnagiriआठवड्यात वादळी पावसाची शक्यता, मच्छीमाऱ्यांनी संबधीत कालावधीत समुद्रात जावू नये

आठवड्यात वादळी पावसाची शक्यता, मच्छीमाऱ्यांनी संबधीत कालावधीत समुद्रात जावू नये

ताशी ४०-५० कि.मी ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून मच्छीमाऱ्यांनी संबधीत कालावधीत समुद्रात जावू नये.

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं जिल्ह्यात २०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे जनतेने सावधगिरीने राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मागील वर्षी झालेल्या अति वृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यंदाच्या पावसाला सुरुवात झाल्यापासून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तांत्रिक मासेमाऱ्यांनी देखील नौका किनार्यावर उभ्या केल्या आहेत.

रत्नागिरी भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, २० जून ते २४ जून २०२२ या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा या ठिकाणी ताशी ४०-५० कि.मी ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून मच्छीमाऱ्यांनी संबधीत कालावधीत समुद्रात जावू नये. सध्या केवळ पारंपारिक मच्छीमारांना समुद्रात मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. बाकी तांत्रिक मासेमारी करणाऱ्यांना पावसाळ्याचे बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात विशेष करून माशांचा विणीचा हंगाम असतो आणि किनार्यावर माशांच्या खाद्याची पण उपलब्धता देखील असते. त्यामुळे या कला तांत्रिक मासेमारीवर बंदी घालण्यात येते.

तसेच २० जून ते २५ जून २०२२ या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. किनारी भागात उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु, औषधांचा साठा करून ठेवावा आणि बाहेर पडणं टाळावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. तरी नागरिकांना सावधानतेचा व सुरक्षितता बाळगावी. संबंधित कार्यक्षेत्रातील सर्व मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular