27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriअमेरिकन महिलेला मायदेशी जाण्याची ओढ, प्रकृतीमध्ये सुधारणा

अमेरिकन महिलेला मायदेशी जाण्याची ओढ, प्रकृतीमध्ये सुधारणा

ललिताला स्क्रिझोफ्रेनिया या नावाचा मानसिक आजार असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.

सावंतवाडी येथील जंगलात सापडलेली अमेरिकन महिला ललिता काय (रा. अमेरिका मॅसेच्युस) हिच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. तिला मायदेशी अमेरिकेला जाण्याची ओढ लागली आहे. त्याअनुषंगाने कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. मुंबईपर्यंत या महिलेला शासकीय खर्चाने पाठविले जाईल. तेथून पुढे अमेरिकन दुतावासामार्फत नेले जाईल, अशी माहिती मनोरुग्णालयाच्या प्रादेशिक अधिकारी डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील जंगलात सापडलेल्या त्या अमेरिकन महिलेचे रहस्य रत्नागिरीत आल्यानंतर उलगडले.

ललिता काय (रा. अमेरिका मॅसेच्युस) असे त्या महिलेचे नाव आहे. तिने सुरुवातीला सांगितलेली माहिती खोटी होती. कारण तिचे लग्नच झाले नसल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यांचे कुटुंब साईभक्त असल्याने तिचे नाव ललिता ठेवले. तामिळनाडू आश्रमात ती मॉडर्न डान्स आणि योगाचे क्लास घ्यायची. परंतु ती आर्थिक अडचणीत होती. पासपोर्ट आणि व्हिसासाठी गोव्याला यायची. आर्थिक विवंचनेतुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि या स्थितीत ती जंगलात पोहचली. ललिताला स्क्रिझोफ्रेनिया या नावाचा मानसिक आजार असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.

त्यातूनच हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता आहे. कारण या आजाराची जी लक्षणे आहेत, त्यामध्ये रुग्ण असे काही करू शकतो. हा एक गंभीर आजार असून त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि तिने जंगलात स्वतःला बांधून घेतले असावे, असा अंदाज आहे. याबाबत बोलताना डॉ. फुले म्हणाल्या, जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेला प्रादेशिक मनोरुग्णालयात आणण्यात आले. त्या अमेरिकन महिलेची व्यवस्था तसेच उपचार करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular