26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriचॅटिंग करणारा एक, फोनवर बोलणारा दुसराच, चंदीगडची तरुणी पडली प्रेमात

चॅटिंग करणारा एक, फोनवर बोलणारा दुसराच, चंदीगडची तरुणी पडली प्रेमात

मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा आहे.

‘डीपी’ला वेगळाच फोटो, चॅटिंग करणारा एक आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी फोनवर बोलणारा दुसराच. अशा प्रकारे सोशल मीडियावरील ओळखीचे प्रेमात रुपांतर होत असताना चंदीगड-पंजाबमधील तरुणीला फसवून थेट रत्नागिरीत आणले गेले. परंतु इथे आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर एका संशयितावर गुन्हा दाखल झाला. यावरून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा आहे. पोलिस दलाने या रॅकेटच्या मुळापर्यंत जावे, अशी मागणी सकल हिंदू समाज संघटनेने केली आहे. चंदीगड येथील एका तरुणीबाबत हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.

संबंधित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्याशी फोनवर बोलणाऱ्याने आपले नाव तिला हर्षकुमार यादव सांगितले होते. त्यांनी एकमेकांना आपले फोटो पाठवले होते. परंतु संशयित तिच्याशी कधीही व्हिडिओ कॉलवर बोलण्यास तयार नव्हता. आपण प्रेमात आंधळे होऊन घर सोडल्याचे तिने सांगितले. परंतु रत्नागिरीत आल्यानंतर तिने हर्षकुमारच्या मोबाईलवर फोन केल्यावर तो फोन एका तरुणीने उचलून हा नंबर एका मुलाचा असल्याचे सांगितले. रत्नागिरी पोलिसांनी याबाबत तपास केल्यानंतर हा नंबर एका अल्पवयीन मुलाचा असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावल्यावर त्याने आपले खरे नाव हर्षकुमार यादव नसल्याचे सांगितले.

या अल्पवयीन मुलाने मुंबईतील त्याचा मित्र अयान याच्यासाठी हर्षकुमार यादव हे खोटे नाव धारण करून पीडितेशी बोलत असल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, पीडितेशी फोनवर हा अल्पवयीन मुलगा बोलायचा, तर मुंबईतील ‘अयान’ इन्स्टाग्रामवर तिला मेसेज करायचा किंवा फोन करायचा. ती तरुणी मोबाईलवर सांगेल त्याप्रमाणे करत होती. पळून जाण्याच प्लॅन देखील फोनवरूनच झाला. चंदीगडहून रेल्वेने अर्ध्या वाटेत आल्यानंतर तिला आपले सीमकार्ड काढून टाकण्यास सांगितले. त्यामुळे या मुलीचा कोणाशीही काही संपर्क राहिला नव्हता.

रत्नागिरीतून पळून जाण्यासाठी दोघांच्या नावाची गाडी सजवून रेल्वे स्थानकात उभी आहे, असेही तिला सांगण्यात आले होते. परंतु तिच्या सुदैवाने रेल्वे लवकर आली. तेव्हा रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर तिला ती सजवलेली गाडी कुठेच दिसली नाही. आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.

RELATED ARTICLES

Most Popular