22.4 C
Ratnagiri
Friday, February 13, 2026

रत्नागिरीतील नाट्यगृह नाकापेक्षा मोती जड

रत्नागिरी पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि चिंताजनक...

ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे मालगुंडमध्ये दिमाखात अनावरण

“ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सुख-दु:खे, संघर्षाची गाथा आणि...
HomeEntertainmentकॉफी विथ करण कार्यक्रमात आमिरनं उलगडले आयुष्यातील महत्वाचे क्षण

कॉफी विथ करण कार्यक्रमात आमिरनं उलगडले आयुष्यातील महत्वाचे क्षण

रीना आणि किरण या दोघींशी घटस्फोट घेतल्यानंतरही आमिरचं त्यांच्याबरोबर छान बाँडिंग आहे.

आमिर खान आपल्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनाबाद्द्ल कायमच चर्चेत असतो. आमिरचा आधी रीना दत्ता आणि त्यानंतर किरण राव यांच्यापासून घटस्फोट घेतला ,परंतु दोघींबरोबर घटस्फोट घेतल्यानंतरही आमिरची या दोघीबरोबर अजूनही छान बाँडिंग आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण कार्यक्रमात आमिरनं या दोघींबरोबर त्याचं नातं कसं आहे हे उलगडून सांगितलं आहे. आमिरनं सांगितलं की, आजही किरण आणि रीनाबरोबरचं त्याचं नातं खूप चांगलं आहे.

आमिरचं पहिलं लग्न रीना दत्ताबरोबर १९८६ मध्ये झाले होते. परंतु २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरच्या आयुष्यात किरण राव आली. या दोघांनी २००५ मध्ये लग्न केलं. परंतु त्यांचं लग्नही फार काळ टिकलं नाही. २०२१ मध्ये किरण आणि आमिरनं वेगळं होत असल्याचं जाहीर केलं आहे. रीना आणि किरण या दोघींशी घटस्फोट घेतल्यानंतरही आमिरचं त्यांच्याबरोबर छान बाँडिंग आहे.

इतकंच नाही तर त्या दोघींबद्दल त्याच्या मनात खूप आदर आहे. त्या दोघीही त्याच्या कुटुंबाचा आजही भाग आहेत. किरण आणि रीनामध्ये भांडण असल्याच्या वृत्ताचा आमिरनं स्पष्टपणे नकार दिला. त्यानं या मुलाखतीमध्ये असंही सांगितलं की, आजही ते सगळेजण आठवड्यातून एकदा भेटतात. कुणी कितीही व्यग्र असले तरीही या भेटीसाठी प्रत्येकजण येतोच. आमचं एकमेकांबरोबर छान नातं आहे, एकमेकांवर खूप प्रेम आणि आदरदेखील आहे.

आमिरच्या कामाबाबत सांगायचं तर ११ ऑगस्ट रोजी आमिरचा लाल सिंह चड्ढा हा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमात आमिर आणि करिनाची जोडी पुन्हा एकदा बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दरम्यान लाल सिंह चड्ढा सिनेमावर बहिष्कारा घालण्याबाबत आमिरनं प्रेक्षकांना असं न करण्याचं आवाहन केलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular