23.1 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeEntertainmentखा.अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेमुळे वादाला तोंड

खा.अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेमुळे वादाला तोंड

एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करणे म्हणजे त्याच्या विचार धारेशी शंभर टक्के सहमत असतो असं होत नाही.

सध्या राजकारणात सिनेसृष्टीचा आणि सिनेसृष्टीचा राजकारणामध्ये हस्तक्षेप वाढत चालला आहे. कलाकार एखादी भूमिका वठवत असताना त्याचे राजकारण घडवून आणून, समाजातील वातावरण खवळून टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.

अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आगामी चित्रपटात नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ असं या हिंदी चित्रपटाचं नाव असून येत्या महिना अखेरीस तो ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर वादाला तोडं फुटलं आहे.

काहींनी त्यांना समर्थन दिले आहे तर काहीनी त्याला प्रचंड विरोध दर्शविला आहे. अमोल कोल्हे नथुराम गोडसेची भूमिका साकारात असल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. कोल्हे यांच्या या निर्णयावर, त्यांच्याच पक्षाचे राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आहे.

मात्र विविध स्तरामधून होणारा विरोध पाहता, आता मात्र अमोल कोल्हे यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, ‘पडद्यावरील भूमिका आणि राजकीय भूमिका यात गल्लत करू नका,’ असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग २०१७ साला मध्ये झालं आहे, आणि तेव्हा मी राजकारणात सक्रीय देखील नव्हतो,  किंवा कोणत्याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नव्हतो.

दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करणे म्हणजे त्याच्या विचार धारेशी शंभर टक्के सहमत असतो असं होत नाही. काही भूमिकांशी आपण सहमत असतो, तर काहींशी आपण विचारधारेंशी सहमत नसतानाही भूमिका साकारतो. मुळात मी माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधी हत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे केवळ एक कलाकार म्हणून भूमिका निभावताना, त्याचा राजकीय विचारांशी कोणताही संबंध जोडला जाऊ नये. या दोन संपूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत,’  असा खुलासा खास. कोल्हे यांनी केला आहे.

अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर निर्माण झालेल्या वादावर शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटलं, अमोल कोल्हे हे राजकरणाव्यतिरिक्त कला क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. यांनी एक कलाकार म्हणून हि भूमिका साकारली आहे. त्यामुळे कुठल्याही सिनेमात कलाकार एखादी भूमिका घेत असेल तर केवळ कलाकार म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे.

त्यासोबतच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. यात त्यांनी गोडसेची भूमिका करणं म्हणजे गोडसेच्या प्रवृत्तीचं समर्थन करणं आहे का?  असा सवाल केला. तसेच अमोल कोल्हे यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं मत व्यक्त केलं. मीही स्वतः: गोडसेची भूमिका याआधी साकारली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular