26.9 C
Ratnagiri
Wednesday, October 30, 2024
HomeRatnagiriगणपतीपुळेतील रस्त्याचे वाजले तीनतेरा, पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य

गणपतीपुळेतील रस्त्याचे वाजले तीनतेरा, पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य

या परिसरातील रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

तालुक्यातील गणपतीपुळे येथे असलेल्या सुर्वेवाडी ते ठावरेवाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले आहे; परंतु अवघ्या काही दिवसात झालेल्या पावसाने रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांसह पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गणपतीपुळे हे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी दरदिवशी शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. या परिसरातील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करत असल्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटकांची नोंद येथे होते. त्यामुळे या परिसरातील रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मे महिन्यात सुर्वेवाडी ते ठावरेवाडीपर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते; परंतु जून महिन्यात पडलेल्या पावसाने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

७०० ते ८०० मीटरचा हा रस्ता आहे. मुसळधार पावसात त्याची खडी वाहून गेली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेचा असल्यामुळे बांधकाम विभागांच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गणपतीपुळे येथील सुर्वेस्टॉप ते ठावरेवाडी पर्यंतचा हा रस्ता मे महिन्यात दुरुस्त केला गेला होता. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत आणि वाहतुकीसाठी चांगला असेल, अशी अपेक्षा होती; परंतु सध्याची स्थिती पाहता ग्रामस्थांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular