महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या कंपनीमध्ये केम्पेगौडा यांचा ते वाहन खरेदी करण्यासाठी तुमकूर येथील महिंद्रा शोरूममध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या बाह्य रूपावरून सेल्समनने त्यांचा अपमान केला. या प्रकरणावर बराच गदारोळ झाला, त्यानंतर खुद्द आनंद महिंद्रा यांना प्रतिक्रिया द्यावी लागली आहे.
घडले असे कि, नुकतेच केम्पेगौडा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये शेतकरी केम्पेगौडा हे महिंद्रा बोलेरो खरेदी करण्यासाठी गेले असता, तेथील सेल्समनने त्यांचे कपडे पाहून सांगितले की, यांच्याकडे गाडी खरेदी करण्यासाठी १० लाख तर काय १० रुपयेही नसतील. सेल्समनने सांगितले की, जर त्यांनी अर्ध्या तासात १० लाख रुपये आणले तर त्यांना तात्काळ घरापर्यंत कारची डिलिव्हरी देईन. अशा प्रकारे झालेला अपमान शेतकऱ्याच्या मनाला लागला आणि त्याने अर्ध्या तासात १० लाख रुपये आणले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर वाहन डिलिव्हरीसाठी अजून चार दिवस लागतील, असे सेल्समनने सांगितल्यावर त्यातूनच पुढे सर्व वाद सुरु झाला. या वर्तणुकीचा व्हिडिओ व्हायरल करून लोकांनी आनंद महिंद्राना ट्वीटरला टॅग करत न्यायाची मागणी केली.
महिंद्रा ऑटोमोटिव्हने ट्विटरवर अधिकृत निवेदन जारी करून शेतकरी केम्पेगौडा यांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करून केम्पेगौडा आणि त्यांच्या मित्रांना २१ जानेवारी रोजी आमच्या डीलरशिपच्या भेटी दरम्यान झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. वचन दिल्याप्रमाणे, आम्ही पुढील उपाययोजना केली आहे आणि हे प्रकरण आता सोडवण्यात आले आहे,” असे कंपनीने म्हटले आहे.
“आम्ही केम्पेगौडा आमच्यासोबत असल्याबद्दल आभार मानतो. आम्ही त्यांचे आमच्या महिंद्रा कुटुंबामध्ये स्वागत करतो,” असे कंपनीने ट्विट पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याच ट्विटला रिट्विट करत महिंद्राचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी देखील लिहिले आहे कि, मी श्री. केम्पेगौडा यांचे स्वागत करतो.