27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeEntertainmentआनंद महिंद्रांच्या उत्तराने अनेक युजर्सची मने जिंकली

आनंद महिंद्रांच्या उत्तराने अनेक युजर्सची मने जिंकली

सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या वडिलांची प्रेरणादायी गोष्ट शेअर केली आणि वडिलांच्या प्रवासाबद्दल सांगितले.

आनंद महिंद्रा यांचे ट्विट आणि प्रत्युत्तरे अनेकदा सोशल मीडिया वापरकर्त्यांची मने जिंकण्यात यशस्वी होतात. पुन्हा एकदा महिंद्राचे उत्तर तुमचे मन आनंदित करेल. वास्तविक, सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या वडिलांची प्रेरणादायी गोष्ट शेअर केली आणि वडिलांच्या प्रवासाबद्दल सांगितले. या माणसाच्या वडिलांचा चाय वाला ते अधिकारी असा प्रवास झाला. यावर महिंद्राच्या उत्तराकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

सुंदर शेट्टी यांनी सांगितले की, १९६५ मध्ये त्यांचे वडील महिंद्रा कॅन्टीनच्या कारखान्यात चहा विकायचे. पण शेट्टीच्या वडिलांचे कौशल्य पाहून कंपनीने त्यांना वेल्डिंग विभागात नोकरी देऊ केली. सर्व प्रथम सुंदर शेट्टीने शेअर केलेले व्हायरल ट्विट जरूर वाचावे. ज्यामध्ये त्यांनी सविस्तर रित्या आपल्या वडिलांच्या कारकीर्दीचा विशेष उल्लेख केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी जेंव्हा हे ट्वीट वाचले तेंव्हा प्रथम त्यांनी सुंदरला उशिरा दिलेल्या उत्तराबद्दल आनंद महिंद्रा यांनी माफी मागितली. महिंद्रा पुढे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीच्या वडिलांसारख्या कथा त्याना काम करत राहण्यासाठी प्रेरित करत असतात. जीवन बदलण्याची एकमेव शक्ती व्यवसाय आहे असे त्यांनी त्यांचे वैयक्तिक मत प्रदर्शित केले.

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, त्या माणसाच्या वडिलांची कथा आणि आनंद महिंद्रा यांची हृदय पिळवटून टाकणारी शैली लोकांना खूप प्रभावित करत आहे. इतकेच नाही तर अनेक सोशल मीडिया युजर्स महिंद्राच्या अशा स्वभावाचे कौतुक करताना दिसले. कायमच गरीब आणि हुशार खेळाडू अथवा व्यक्तींना त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या या उत्तराने अनेक युजर्स प्रभावित झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular