26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRajapurसामाईक जमिनीवरून दोन भावांमध्ये वाद, मारहाणीत रुपांतर

सामाईक जमिनीवरून दोन भावांमध्ये वाद, मारहाणीत रुपांतर

जसं सामान बाहेर फेकलं तस आतमध्ये आणून ठेवा‘ असं सांगितलं. परंतु, याचा राग येवून गजानन व प्रशांत यांनी शिवीगाळ करत शिवानंद यांची मान पकडली.

राजापूर तालुक्यातील तळगाव कासारवाडी येथे दोन भावात कुटुंबाच्या सामाईक जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली असून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील ४ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यातील संजना बेलवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती शिवानंद बेलवलकर व दीर गजानन बेलवलकर यांचे सामाईक घर असून एकाच घरामध्ये ते विभक्त कुटुंब पद्धतीप्रमाणे राहतात. फिर्यादी घरामध्ये नसताना गजानन बेलवलकर, प्रशांत बेलवलकर या दोघांनी मिळून सार्वजनिक गणपतीचे साहित्य घराबाहेर फेकून दिले. याचे कारण बेलवलकर यांनी विचारत ‘जसं सामान बाहेर फेकलं तस आतमध्ये आणून ठेवा‘ असं सांगितलं. परंतु, याचा राग येवून गजानन व प्रशांत यांनी शिवीगाळ करत शिवानंद यांची मान पकडली. पतीला मारहाण होत असल्याचे पासून त्यांची भानगड सोडवण्यासाठी संजना या मधी पडल्या असता गजानन याने हातातील दांडक्याने त्यांना मारहाण केली. यामध्ये हे पती-पत्नी जखमी झालेत.

संजना यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार गजानन बेलवलकर, प्रशांत बेलवलकर यांच्या भादविकलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे गजानन बेलवलकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पूर्वीचा कसलातरी राग मनात धरुन आम्ही साहित्य घराबाहेर टाकले असा गैरसमज करुन घेत त्यांनी आम्हाला मारहाण केली, असे म्हटले आहे. गजानन बेलवलकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार शिवानंद बेलवलकर, संजना बेलवलकर यांच्या विरोधात भादविकलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३५२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular