29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeMaharashtraअंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मशाल विरूद्ध कमळ लढत

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मशाल विरूद्ध कमळ लढत

मुंबई महापालिकेच्या सेवेच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला होता.

मागील काही दिवसांपासून अंधेरी पोटनिवडणूकीवरून राज्यातील राजकारण तापलं आहे, उद्या निवडणूक उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, या दरम्यान ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरूध्द भाजपचे मुरजी पटेल असा सामना पाहायला मिळणार आहे.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा गोंधळ वाढताच भाजपने सावध भूमिका घेतली आणि पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त पुढे ढकलला. लटके यांच्या राजीनाम्याच्या वादावर उच्च न्यायालयाच्या निकाल दिल्यानंतर पटेल यांचा अर्ज शुक्रवारी भरला जाईल, असे पक्षातर्फे कळविले आहे.

या मतदारसंघातील शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, मुंबई महापालिकेच्या सेवेच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला होता. शेवटी तो न्यायालयात गेल्याने भाजप आणि शिंदे गटाने नव्या चाली रचल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ही जागा भाजपला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झाले. मुरजी पटेल हे कमळ या चिन्हावर अंधेरी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मशाल विरूद्ध कमळ अशी लढत आता पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular