24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriअंगारकी चतुर्थी निमित्त मनाई आदेश

अंगारकी चतुर्थी निमित्त मनाई आदेश

महाराष्ट्र शासनाकडील सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशान्वये सुधारीत मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे सर्वांसाठी उघडी करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी २३ नोव्हेंबर रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्या निमित्ताने भाविक रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून सुध्दा मोठया प्रमाणात गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. सदय परिस्थितीमध्ये कोविड-१९ या साथीच्या रोगाची महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असल्याने तसेच श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेले भाविक दर्शना नंतर किंवा दर्शना आधी श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच असलेल्या समुद्रामध्ये आंघोळ किंवा पोहण्यासाठी जाण्याचा मोह त्यांना आवरणे शक्य होत नाही. अशा वेळी बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे यापुर्वीही अनेक जणांनी आपले प्राण गमवले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव वाढून जिवितहानी होऊ नये यासाठी समुद्राच्या पाण्यात पोहण्यास गेले असता बुडुन मृत्यु,  जिवितहानी होऊ नये म्हणून ठोस उपाययोजना म्हणून डॉ.बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी,  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार, नागरीकांची जिविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून श्री क्षेत्र गणपतीपुळे याठिकाणी दिनांक २३ नोव्हेंबर रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत कोणत्याही भाविकाना श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास या आदेशाव्दारे मनाई करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular