26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraनुकसान भडकवणाऱ्याचं होत नाही, ते कामगारांचं होतं – अनिल परब

नुकसान भडकवणाऱ्याचं होत नाही, ते कामगारांचं होतं – अनिल परब

मागील ८ नोव्हेंबरपासून सुरु असेलेले एसटी कामगारांचे आंदोलन आत्ता जास्तच चिघळले आहे. एसटी कर्मचारी आता कोणत्याही कारणास्तव मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटण्यास तयार नसल्याचे चित्र समोर दिसत आहे. अनेक विरोधी पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचार्यांना पाठींबा दर्शविताना दिसत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचार्यांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे कि, “माझी कामगारांना विनंती आहे की आपल्याला कुणी भडकवत असेल, तर त्याला बळी पडू नका. कारण नुकसान भडकवणाऱ्याचं होत नाही,  ते कामगारांचं होतं.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संप अजूनच घट्ट होत चाललेला दिसत आहे. प्रशासनाचा भाग म्हणून काल कारवाई झाली आहे. कुणावरही कारवाई करण्याची आमची इच्छा नाही. पण सरकार म्हणून आम्ही जनतेचा सुद्धा तेवढाच विचार करण्यास बांधील आहोत. लोकांना कुठेही वेठीस धरलं जाऊ नये. त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व संपत उतरलेल्या कर्मचार्यांना आवाहन करतो आहे कि, एसटी कर्मचाऱ्यांनी संप त्वरित मागे घ्यावा. तुमच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत. उरलेल्या मागण्या दिवाळीनंतर चर्चा करून पूर्ण करू असं मी लेखी आश्वासन दिलं आहे,  असे अनिल परब यानी सांगितले.

राज्य सरकारला सुद्धा न जुमानता, आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. मात्र, उच्च न्यायालयाच्या मनाई आदेशाकडे पाठ फिरवून, त्यानंतर देखील संप सुरूच ठेवल्यामुळे एसटी महामंडळाने संपकरी कामगारांच्या विरोधामध्ये न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या प्रकरणा बाबत आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपत सहभागी झालेल्या कर्मचार्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपा नेत्यांवर निशाणा साधला असून ते पुढे म्हणाले कि, पडळकर आणि खोत कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का?” असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular