26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriपालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी शहर व ग्रामीण भागातील संपर्क यंत्रणा दुरुस्त करण्याच्या...

पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी शहर व ग्रामीण भागातील संपर्क यंत्रणा दुरुस्त करण्याच्या दिल्या सूचना

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने, रस्ते, विजेचे पोल, मोबाईल टॉवरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्तेच्या रस्ते  पाण्याखाली गेल्याने, अनेक गावांचे एकमेकांशी संपर्क तुटले होते. मोबाईलचे सुद्धा नेटवर्क गेल्याने, वीज नसल्याने, एकमेकांना संपर्क करणे कठीण बनले होते, त्यामुळे संकटकाळात कोणाची मदत मागणे सुद्धा अशक्यप्राय बनले होते.

पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना  शहर व ग्रामीण भागातील संपर्क यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर कार्यान्वित  करा, अशा सूचना  चिपळूण दौऱ्यावर असताना दिल्या. पंचायत समिती सभागृह, चिपळूण येथे जिल्ह्यातील चिपळूण व खेड तालुक्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

सदर बैठकीला जिल्ह्यधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, आ. शेखर निकम, आ. योगेश कदम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, खा. विनायक राऊत, आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी, यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अॅड.परब पुढे म्हणाले की, पुरामुळे शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे महत्वाच्या विषयांची प्राथमिकता ठरवून घेऊन त्यानुसार आराखडा नियोजन करणे गरजेचे आहे. पुरामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात चिखल आणि कचरा झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. पूर ओसरल्यावर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ही रोगराई टाळण्यासाठी औषधांचा साठा, वैद्यकीय पथक यांचे योग्य नियोजन आरोग्य विभागाने तत्काळ करावे. पंचनामे करण्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन जे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्याबाबत पुढील कार्यवाही तातडीने करावी, तसेच उर्वरित पंचनामे वेळ न दवड्ता पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी बैठकीत दिल्या आहेत.

कृषी पंचनामे, मोबाईल संपर्क यंत्रणा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत.

RELATED ARTICLES

Most Popular