25.8 C
Ratnagiri
Thursday, September 29, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeDapoliअनिल परब यांची “ती”  दोन्ही बांधकामे तोडण्याचे आदेश

अनिल परब यांची “ती”  दोन्ही बांधकामे तोडण्याचे आदेश

सीआरझेड व ना विकास क्षेत्र यामध्ये हे बांधकाम केले असल्याने सीआरझेड कायदा २०११ चा भंग झाला आहे.

दापोली मुरुड येथील अनिल परब यांच्या “त्या” दोन रिसॉर्टची पर्यावरणाशी संबंधित तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली होती. त्यानंतर त्याचा अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर केला होता. या अहवालाच्या आधारे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २२ ऑगस्टला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथोरिटीचे सदस्य सचिव व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांना पत्र पाठवले आहे.

सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या मुरुड येथील साई रिसॉर्ट व सी कौंच रिसॉर्टला पर्यावरणाशी संबंधित तज्ज्ञ समितीने भेट देऊन त्यांनी पाठवलेल्या अहवालातील निष्कर्ष व शिफारशी काय आहेत, याची माहिती पत्रात दिली आहे. सीआरझेड व ना विकास क्षेत्र यामध्ये हे बांधकाम केले असल्याने सीआरझेड कायदा २०११ चा भंग झाला आहे. त्यामुळे ही दोन्ही बांधकामे तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील तत्कालीन पालकमंत्री अॅड. अनिल परब यांचे बहुचर्चित साई रिसॉर्ट व सी कौंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश केंद्र शासनाच्या वन, पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सी कौंच रिसॉर्टला ३७ लाख ९१ हजार २५० रुपये व साई रिसॉर्टला २५ लाख २७ हजार ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच ही दोन्ही बांधकामे तोडल्यानंतर त्याची पुनर्प्रक्रिया किंवा पुनर्वापरासाठी किंवा स्थानिक सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीने विल्हेवाटीसाठी सुरक्षितपणे वाहतूक करणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास हे बांधकाम तोडण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत घेतले पाहिजे आणि सक्षम अधिकारी व तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली हे बांधकाम तोडण्यात यावे. तसेच आजूबाजूच्या वातावरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी वृक्षारोपण करून ते क्षेत्र विकसित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एका पत्राच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करावी, अशी विनंती केली असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular