26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeDapoliआंजर्ले, वेळास होणार जैवविविधता वारसास्थळ...

आंजर्ले, वेळास होणार जैवविविधता वारसास्थळ…

लोकांमध्ये जागृती होऊन कासवांचे संवर्धन व संरक्षण होण्यास मदत होईल.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (नागपूर) यांच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील आंजर्ले (ता. दापोली) व वेळास, (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सिंह यांनी ही माहिती दिली. दालनात जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय जैविक विविधता व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा व मानवी कल्याणाशी निगडित असल्याने या स्थळांची नोंद घेऊन त्या स्थळांना जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित केल्यास जलदरीतीने जैवविविधतेचा होणारा ऱ्हास रोखण्यास मदत होणार आहे.

ऑलिव्ह रिडले कासवांच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती होऊन कासवांचे संवर्धन व संरक्षण होण्यास मदत होऊन पर्यटनाच्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. आंजर्ले व वेळास या ठिकाणी जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही शीघ्र गतीने व समितीच्या मंजुरीने करण्यात येईल. बैठकीमध्ये जिल्ह्यातील आंजर्ले व वेळास येथील समुद्रकिनारे ऑलिव्ह रिडले कासवांकरिता प्रसिद्ध असून, त्यांचे संवर्धन करण्याचे महत्त्व दर्शवणारे सादरीकरण विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular