30.8 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

नारायण तलावावर ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर चिपळूण नगरपालिकेचा पुढाकार

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नारायण तलाव परिसरात...

जगबुडी नदीकिनारा अस्वच्छतेच्या विळख्यात…

जगबुडी नदीकिनारी शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत...

खा. सुनिल तटकरेंचं गलिच्छ राजकारण शिवसेना नेते रामदास कदमांचा आरोप

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात...
HomeRatnagiriलाचलुचपत प्रतिबंधकविभागाची आ. वैभव नाईक यांना नोटीस

लाचलुचपत प्रतिबंधकविभागाची आ. वैभव नाईक यांना नोटीस

आमदार वैभव नाईक यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा अद्याप सुरूच असून पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय, रत्नागिरी येथे चौकशी कामी २८ जूनला हजर राहण्यासाठी आम. वैभव विजय नाईक यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्या नोटीसीमध्ये उघड चौकशी कामी जबाब नोंद करण्यासाठी उपस्थित रहावे, असे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून आ. वैभव नाईक यांची उघड चौकशी मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. सदर उघड चौकशीच्या अनुषंगाने १ जानेवारी २००२ ते २९ स्पटेंबर २०२२ या कालवधीतील आपले उत्पन्न, सर्च व मालमत्ता याबाबत मत्ता व त्याचे ते फॉर्म्स त्यामध्ये नमुद मुद्द्यांच्या १ अनुषंगाने त्वरीत भरुन देणेसाठी व मत्ता सामित्वाचे १ ते ६ फॉर्म मधील दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने जबाब नोंद करण्यासाठी ६ वेळा पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय पत्रान्वये समक्ष व ई मेलव्दारे कळविण्यात आलेले आहे. परंतु नमुद दिनांकास उपस्थित राहिलेले नाहीत, अशी नाराजी या नोटीस मधून व्यक्त केली आहे.

लाच प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून मालमत्तेच्या सुरु असलेल्या उपद चौकशीचे अनुषंगाने उत्पन्न सर्व व मालमत्ता बाबतची आवश्यक ती माहिती देण्यात आलेल्या मत्ता व दामित्वाचे १ चे फॉर्म तसेच सदर कालावधीतील आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, पोल तन्ना शिट प्रॉफीट ॲन्ड लॉस डिटेल्स पौडम लासह इत्यादी माहिती व त्यासंबंधीत कागदपत्रासह २८ जून २०२३ रोजी ११ वाजता पोलीस उपअधीक्षक रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित रहावे, अशी नोटीस अशी नोटीस पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी बजावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular