27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

शाळा, महाविद्यालयांना वाढीव अनुदान द्या, आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक...

मुसळधार पावसाने भातपीक पाण्याखाली, साखरपा पंचक्रोशीला झोडपले

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पंचक्रोशीला मुसळधार पावसाने बुधवारपासून...

लांज्यात रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास पोलिस बंदोबस्तात प्रारंभ

मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरात रस्त्याच्या कडेला...
HomeChiplunलाच देणारा पोलिसांच्या ताब्यात, पोलीस निरीक्षकांची अजब कामगिरी

लाच देणारा पोलिसांच्या ताब्यात, पोलीस निरीक्षकांची अजब कामगिरी

कारवाईच्या अनुशंगाने प्रस्ताव न पाठवता ट्रक आतील लाकडासह सोडून देण्यासाठी पोलीस निरीक्षक कदम यांना वारंवार लाच देण्याचे आरोपी पटाईत आमिष दाखवत होते.

अनेकवेळा आपली कामे लवकर व्हावीत यासाठी लाच दिली जाते. किंवा काम त्वरेने करून हव असेल तर समोरचा अधिकारीच लाच मागतो.  समोरचा अधिकारी अथवा कर्मचारी या आमिषाने लवकर काम करतील अशी लाच देणाऱ्याची धारणा असते. पण जसे लाच घेणे हा गुन्हा आहे त्याचप्रमाणे लाच देणे हा सुद्धा कायद्यान्वये गुन्हाच आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एक वेगळेच प्रकरण उघडकीस आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच लाच घेणाऱ्याला नाही तर देणाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत विभागाला यश आले आहे. या वेगळ्या प्रकरणाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. लाकडाचे व्यावसायिक असणाऱ्या निजाम हुसेन पटाईत वय ५०, गोवळकोट, चिपळूण त्यांचा लाकूड वाहतूक करणारा ट्रक हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कारवाई करून लोटे पोलिस दुरक्षेत्र येथे लावलेला होता. खेड येथील लोटे दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाळू कदम हे तिथे कार्यरत आहेत.

त्यानंतर निजाम हुसेन पटाईत यांनी त्याबाबत झालेला दंड भरलेला होता. पुढे या ट्रक मधील असलेल्या लाकडाबाबत वनविभाग यांना कारवाईच्या अनुशंगाने प्रस्ताव न पाठवता ट्रक आतील लाकडासह सोडून देण्यासाठी पोलीस निरीक्षक कदम यांना वारंवार लाच देण्याचे आरोपी पटाईत आमिष दाखवत होते. ५ हजारावरून ३ हजाराची लाच देण्याचे ठरवले. ही रक्कम देताना निजाम हुसेन पटाईत यांना पकडण्यात आले आहे. सहायक पोलीस निरिक्षकानेच उत्तम काम केल्याने लाच देणाऱ्यालाही वचक बसणार आहे. सहायक पोलीस निरिक्षकानीच हे काम उत्तमरीत्या केल्याने लाच देणाऱ्यालाही यापुढे वचक बसणार आहे.

हा सापळा अधिकारी सुशांत चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक ला.प्र.वि., रत्नागिरी यांच्यासह सापळा पथक स.फौ.संदीप ओगले, पोना. दीपक आंबेकर, पोशी अनिकेत मोहिते, पो. ह. विशाल नलावडे यांनी कामगिरी केली.

RELATED ARTICLES

Most Popular