बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह ९ डिसेंबर रोजी एकदम राजेशाही अंदाजात पार पडला. अनेक दिग्गजांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. अनेकानी सोशल मिडीयाच्या सहाय्याने दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यातील अभिनेत्री अनुष्का शर्माने बॉलिवूडचे नवविवाहित दाम्पत्य विकी कौशल आणि कतरिना कैफला यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुष्काने सोशल मीडिया पोस्टमध्ये विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा फोटो शेअर केला असून, अनुष्का पुढे म्हणाली आहे कि, “तुम्हाला दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही दोघे आयुष्य भर एकत्र रहा, तुमच्यात कायम उदंड प्रेम राहो. याचा ही आनंद आहे की अखेर तुमचे लग्न झाले आणि तुम्ही तुमच्या नवीन घरात गृहप्रवेश कराल आणि आता आम्हाला कंस्ट्रक्शनचा आवाज ऐकायला मिळणार नाही.”
तिच्या या हटके शुभेच्छांसह कतरिना आणि विकी आता तिचे शेजारी होणार असल्याचेही सांगितले आहे. लग्नाआधीच विकी कौशल मुंबईमध्ये नवीन घराच्या शोधात होता. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर त्याने जुहूमध्ये एक आलिशान अपार्टमेंट घेतले. विराट, वामिका आणि अनुष्का शर्मा यांचे घरही याच इमारतीमध्ये आहे. रिअल इस्टेट ओनर वरुण सिंह यांनी मीडिया हाऊसला माहिती दिली कि, विकी कौशलने हे अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे आणि त्यासाठी मोठी रक्कम अदा केली आहे. विकीने इमारतीमधील आठवा मजला भाड्याने घेतला असून ३६ महिन्यांसाठी १.७५ कोटी एवढी रक्कम अॅडव्हान्स दिली आहे.
अनुष्काशिवाय आलिया भट्ट, करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनीही कतरिना आणि विकी यांना लग्नाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.