29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeRajapurपाचल-अणुस्कुरा मार्गाच्या तात्पुरत्या स्वरूपातील दुरुस्तीला प्रारंभ

पाचल-अणुस्कुरा मार्गाच्या तात्पुरत्या स्वरूपातील दुरुस्तीला प्रारंभ

कोकणामध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्ग, अगदी खेडोपाड्यातील रस्ते यांची अवस्था बिकट झालेली होती. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटाची पडझड झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून राजापूर तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं हा मार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहनाचे व प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

ही बाब लक्षात घेऊन आम. डॉ.राजन साळवी यांनी महाराष्ट्र शासनाकडे सदरचा महामार्ग दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण ह्यांना निवेदन देऊन, त्याबाबत सतत पाठपुरावा केला होता.

आम. डॉ.राजन साळवी ह्यांच्या सततचा पाठपुराव्यामुळे राजापूर तालुक्यातील या राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी विशेष रस्ता दुरुस्ती अंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना अशोकजी चव्हाण ह्यांनी ७ कोटी ४४ लाख रुपये मंजूर करून त्याबाबतचा शासन निर्णय कार्यवाहीसाठी मुख्य अभियंता ह्यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. परंतु सदरचे कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास कमीत कमी दोन महिन्याचा कालावधी मागू शकतो.

त्यामुळे आम. डॉ.राजन साळवी ह्यांनी उप कार्यकारी अभियंता दुधाडे आणि यश कंट्रक्शनचे आण्णा भिंगार्डे ह्यांच्यासह सदरच्या महामार्गावर जाऊन पाहणी केली व कामाचा निविदा प्रक्रियेला लागणारा विलंब लक्षात घेऊन वाहन चालक व प्रवाशांचे होणारे हाल थांबण्यासाठी ताबडतोब तात्पुरत्या स्वरूपाच्या डागडुजीच्या सूचना दिल्या. त्यानुसार उप कार्यकारी अभियंता दुधाडे आणि यश कंट्रक्शनचे आण्णा भिंगार्डे ह्यांनी सूचना मान्य करून त्वरीत काम चालू करण्याचे मान्य केले त्यामुळे वाहन चालक व प्रवाशांची होणारा त्रास काही प्रमाणात तरी कमी होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular