26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeTechnologyमृत्युनंतर मयताच्या कागदपत्रांच काय करायचं?

मृत्युनंतर मयताच्या कागदपत्रांच काय करायचं?

मागील वर्षीपासून उद्भवलेल्या कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे प्रत्येकजण आर्थिक, शारीरिक, मानसिक विवंचनेत अडकला गेला आहे. अनेकांनी आपल्या घरातील, शेजारी पाजारी, मित्र मैत्रिणी यांना कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नातेवाईकांना तसेच कुटुंबियांना गमावलं.

परंतु समस्या उरते ती पुढे, ती म्हणजे, कुटुंबातील एखाद्या सदस्याचा अचानक मृत्यू ओढवल्यानंतर आपण इतर सर्व औपचारिकता पूर्ण करतो. मात्र अनेकदा मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कागदपत्राचं काय करायचं याबद्दल अनेकांना काहीच माहिती नसते. नियमांनुसार मृत व्यक्तीच्या पॅन कार्ड, आधार कार्ड, व्होटर आयडी या शासकीय कामांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कागदपत्रांचे नेमके काय करायचे? जाणूया थोडक्यात.

पहिलं महत्वाच कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड रद्द करण्याची सद्य स्थितीला कोणतीच व्यवस्था नाही आहे. त्यामुळे मयत व्यक्तीचं आधार कार्ड सांभाळून ठेवणं ही त्या कुटुंबियांची सर्वस्वी जबाबदारी राहणार आहे.  जेणेकरुन इतर कोणाकडून त्याचा गैरवापर केला जाणार नाही. त्याचप्रमाणे, सदरच्या मृत व्यक्ती मृत्यूआधी जर आधार कार्डाद्वारे कोणतीही शासकीय योजना किंवा सबसिडीचा लाभ घेत असल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला त्वरित कळवीणे गरजेचे आहे. त्यानंतर त्या योजनेतून मृत व्यक्तीचं नाव रद्दबातलं केले जाते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड लॉक केलं जाऊ शकतं. M-Aadhar या अ‍ॅप किंवा UIDAI च्या वेबसाईटद्वारे मृत व्यक्तीचं आधार कार्ड लॉक करता येऊ शकतं. यामुळे मृत व्यक्तीच्या मोबाईल नंबरचा गैरवापर होणार नाही.

दुसर महत्वाच कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. जर संबंधित मृत व्यक्ती इनकम टॅक्स रिटर्न भरत असेल, तर  पॅन नंबर असणं गरजेचे असते. पॅन नंबर हा डी मॅट, बँक अकाउंटसह अनेक कायदेशीर बाबींसाठी लिंक केलेला असतो. त्यामुळे मृत व्यक्तीचं पॅन कार्ड लवकरात लवकर रद्द करणं महत्त्वाचं असतं. मृत व्यक्तीचं पॅन कार्ड चूकुन इतर व्यक्तीच्या हाती लागला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पॅन कार्ड रद्द करण्याआधी कुटुंबियांनी मृत व्यक्तीच्या नावावर असलेले सर्व बँक खाते हे रद्द किंवा दुसऱ्याच्या नावे ट्रान्फर करणे आवश्यक आहे.

तिसर महत्वाच आहे वोटर कार्ड. मृत व्यक्तीच्या नावे बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, मृत्यूनंतर प्रथम मृत व्यक्तीचं वोटिंग कार्ड रद्द करणं महत्वाचं आहे. अन्यथा त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. वोटिंग कार्डचे नाव रद्द करण्यासाठी स्थानिक मतदान कार्यालयामध्ये ७ नंबर फॉर्म  भरून द्यावा लागतो, या प्रक्रियेनंतर वोटिंग कार्ड रद्द केल जाते.

RELATED ARTICLES

Most Popular