29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरीतील भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनलला अखेर मंजूरी

रत्नागिरीतील भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनलला अखेर मंजूरी

रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी पर्यटनस्थळे ही भगवती बंदराच्या आसपास आहेत.

शहरातील भगवती बंदर येथे कुझ टर्मिनलला अखेर मंजूरी मिळाली आहे. तसा अध्यादेश शासनाने शुक्रवारी जारी केला. यामध्ये ३०२ कोटी ४२ लाख १० हजार रक्कमेचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे. लवकरच मुंबई ते गोवा या जलम ार्गावर जलेश व आंग्रीया ह्या क्रुझला थांबा मिळणार आहे. त्यामुळे पर्यटकांना कोकणातीलल निसर्गसौंदर्य आणि पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येणार आहे. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी या. क्क्रुझ टर्मिनलसाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. भगवती बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे.

रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून साधारण १९ कि.मी. अंतरावर भगवती बंदर आहे. जवळच विमानतळ देखील आहे. सद्यस्थितीत मुंबई ते गोवा अशी फेरी सेवा जलेश व आंग्रीया ह्या कुझव्दारे सुरु आहे. मुंबई ते गोवा जलमार्गावर महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीमध्ये कोठेही थांबा नाही. त्यामुळे पर्यटकांना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील पर्यटनस्थळे पाहता येत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी पर्यटनस्थळे ही भगवती बंदराच्या आसपास आहेत.

त्यामुळे भगवती बंदर येथे सुसज्ज असे कुझ टर्मिनल विकसीत केल्यास पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. परीणामी स्थानिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यानुसार भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल विकसीत करण्यासंदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळांनी शासनास प्रस्ताव सादर केला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रस्तावानुसार २०२२- २३ च्या प्रस्तावाला शासनाने मंजूरी दिली आहे. यामध्ये ३०२ कोटी ४२ लाख १० हजार १७१ इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular