25.1 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकोकणातील ५० किनारी पर्यटन आराखड्यास मान्यता

कोकणातील ५० किनारी पर्यटन आराखड्यास मान्यता

महामार्गालगत असेलल्या किनारी गावांना पर्यटनाच्या नव्या मुलभूत सुविधा मिळणार आहेत.

कोकण किनारपट्टीलगत समांतर असणाऱ्या आणि साडेनऊ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या कोकणातील रेवस ते रेडी या सागरी मार्गालगत येणाऱ्या कोकणातील ५० शहरांच्या पर्यटन विकास आराखड्याला शासनाने तांत्रिक मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे कोकणातील ५० शहरे जगभरातील पर्यटकांच्या पर्यटन नकाशावर येणार आहेत. यासाठी तेराशे कोटीचा अतिरिक्त वाढीव निधीला नव्याने मंजुरी देण्यात आली आहे. निसर्गतःच समृध्द असलेल्या कोकणात सात जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यापैकी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील समुद्रकिनारे, प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात.

प्रस्तावित सागरी महामार्गाची सुरुवात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशी असल्याने या जिल्ह्यातील किनाऱ्यालगतची शहरेही पर्यटनियदृष्ट्या विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये ५० शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील २५, रत्नागिरी जिल्ह्यातील १५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० गांवाचा समावेश आहे. यामध्ये रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा येथे असणाऱ्या ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूना मिळणार आहे. या गावात अनेक भागात किनारे, कातळशिल्पे, ऐतिहासिक आणि स्वातंत्र्यसेनानींची जन्मस्थळे आहे.

या वास्तूंनाही या सुविधांबरोबरच सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरीतिल लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ, थिबा पॅलेस, पावस येथील स्वातंत्र्यसैनिक संयुक्त महाराष्ट्र चळळीचे नेते एस. एम. जोशी यांचे जन्मस्थळ, तसेच राजापूर तालुक्यातील वखारींचा कोकण किनारपट्टीतील रेवस रेडी या सागरी महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण पाहता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर त्याला समांतर असलेल्या सागरी महामार्ग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. विविध धार्मिक स्थळे, पर्यटन क्षेत्रे, समुद्रकिनारे, बंदरे, मासळी मार्केट विमानतळ आधी या महामार्गावर आहेत. यामुळे या महामार्गालगत असेलल्या किनारी गावांना पर्यटनाच्या नव्या मुलभूत सुविधा मिळणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular