28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

मोकाट गुरांच्या समस्येकडे यंत्रणांची डोळेझाक…

रत्नागिरी शहरामध्ये मोकाट गुरांचा उपद्रव वाढतच चालला...

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार...
HomeMaharashtraपुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडील स्मारके पर्यटकांसाठी खुली

पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडील स्मारके पर्यटकांसाठी खुली

पर्यटकांनी सुद्धा शासनाने आखून दिलेले कोरोनाचे नियम धाब्यावर बसवू नये, त्याचे शिस्तीने पालन करावे.

कोरोना काळामुळे राज्यातील अनेक ठिकाणची महत्वाची अशी पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली होती. हळू हळू का होईना पण आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता, जशी टप्प्याटप्प्याने पूर्ववत सुरुवात होत आहे, त्याप्रमाणे काही ठिकाणच्या प्रशासनाने पर्यटन स्थळे देखील सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडील स्मारके पर्यटकांच्या भेटीसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधितचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अतीच  वाढल्याने पुणे जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीखाली येणारी अनेक स्मारके बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सध्या कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे असणारी  स्मारके पर्यटकांसाठी उघडी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेस आणि पुरातत्त्व विभागाची स्मारक समाविष्ट आहेत. परंतु त्यातील सिंहगड किल्ला हा वन विभागाच्या अखत्यारीत येत असून, सध्याच्या काळात तरी तो पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पर्यटकांनी सुद्धा शासनाने आखून दिलेले कोरोनाचे नियम धाब्यावर बसवू नये, त्याचे शिस्तीने पालन करावे. मास्क परिधान करणे, शारीरिक अंतर राखणे बंधनकारक असल्याचे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. कोरोना अजून संपुष्टात आलेला नाही, तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती असल्याने शासनाचे कोरोना निर्बंधाचे नियम पाळूनच पर्यटकांनी या विविध रातत्त्व सर्वेक्षण विभागाकडील स्मारके आणि पर्यटनस्थळांचा लाभ घ्यावा असे पुणे प्रशासनाने आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular