29.4 C
Ratnagiri
Sunday, November 24, 2024

सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय सामंत विजयी

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) :- 266 रत्नागिरी...

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurअर्जुना-कोदवलीतील सर्व गाळ काढणार - जिल्हाधिकारी देवेंदर सिंह

अर्जुना-कोदवलीतील सर्व गाळ काढणार – जिल्हाधिकारी देवेंदर सिंह

पूररेषा शहर विकासात अडथळा ठरत आहे. पुराचे संकट दूर करण्यासाठी यंदा लोकसहभाग आणि जिल्हा नियोजनमधील निधीतून अर्जुना- कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात आला.

सतत निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमुळे नव्याने निश्चित केलेली पूररेषा शहर विकासात अडथळा ठरत असली तरीही अर्जुना-कोदवली नदीपात्रातील झालेल्या गाळ उपशामुळे पुराचा धोका कमी झाला आहे. भविष्यात नद्यांमधील शंभर टक्के गाळ काढून राजापूरकरांची पुराच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका करण्याचे नियोजन प्रशासन करत आहे. त्यासाठी करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या राजापुरातील पूररेषेचेही फेरसर्वेक्षण अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रांत कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुळकर्णी, प्रांताधिकारी वैशाली माने, राजापूरचे तहसीलदार शीतल जाधव, लांजाचे तहसीलदार प्रमोद कदम, नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, विवेक गुंड, अंबोळे उपस्थित होते. अर्जुना-कोदवली नद्यांमध्ये गाळ साठलेला आहे. त्यामुळे शहरामध्ये शासनाने जलसंपदा विभागाकडून राजापूर शहरात पूररेषा निश्चित वारंवार पूरस्थिती निर्माण होते. त्यासाठी केली. परंतु ती पूररेषा शहर विकासात अडथळा ठरत आहे. पुराचे संकट दूर करण्यासाठी यंदा लोकसहभाग आणि जिल्हा नियोजनमधील निधीतून अर्जुना- कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात आला. त्यामुळे यावर्षी पुराची तीव्रता कमी झाली.

ही बाब पत्रकार महेश शिवलकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणूस देत शहर विकासात अडथळा ठरत असलेल्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण होणार का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सिंह यांनी अर्जुना व कोदवली नद्यांतील गाळ उपशामुळे काही प्रमाणात पुराचा धोका कमी झाला असून, भविष्यामध्ये शंभर टक्के उपसा झाल्यास पुराचा धोका कायमचा टळणार आहे. गाळ काढण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. काढलेला गाळ नदीपात्राबाहेर वाहतूक करण्याचाही आमचा प्रयत्न राहील. पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular