28.1 C
Ratnagiri
Friday, June 2, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeRajapurअर्जुना-कोदवली नद्यांचा गाळ काढण्यासाठी अनेकांकडून मदतीचा हाथ

अर्जुना-कोदवली नद्यांचा गाळ काढण्यासाठी अनेकांकडून मदतीचा हाथ

अर्जुना, कोदवली नदीच्या गाळ उपशासाठी सध्या १ लाख ४१ हजार जमा झाले असून अजून देखील मदत येणे सुरु आहे.

राजापूर शहराला दरवर्षी अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पूराचा वेढा लक्षात घेऊन, त्यांना  भेडसावणाऱ्या पूर समस्येवर मात करण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि महसूल व नगरपालिका यांच्या पुढाकाराने लोक सहभागातून गाळ उपसा करण्याचा निर्धार राजापूरवासीयांनी केला आहे.

या गाळ उपशाच्या या उपक्रमाला विविध सामाजिक संघटना आणि लोकांकडून उत्स्फूर्तपणे आर्थिक स्वरूपामध्ये मदत केली जात असून मदतीचा ओघ वाढतच आहे. अर्जुना, कोदवली नदीच्या गाळ उपशासाठी सध्या १ लाख ४१ हजार जमा झाले असून अजून देखील मदत येणे सुरु आहे.

गाळ उपशाच्या उपक्रमासाठी राजापूर पत्रकार संघाकडून ११ हजार रुपये, नगर पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांकडून ४५ हजार रुपये,  राजापूर तलाठी-महसूल कर्मचारी संघटनेकडून ७६ हजार २०५ रुपये,  डॉ. राम मेस्त्री यांनी ५ हजार ५५५ रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंतनू दुधाडे यांनी ५ हजार रूपये मदत दिली आहे. अशाप्रकारे लोक सहभागातून, आणि वैयक्तिक रित्या देखील मदत करण्यात आली आहे. या रक्कमांचे धनादेश नुकतेच संबंधित संघटनांकडून प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

विविध संघटनांसह वैयक्तिक स्तरावर करण्यात आलेल्या या मदतीमुळे अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ उपशासाठी आवश्यक असलेली लोकवर्गणी उभारण्याच्या कामाला एक प्रकारे बळ मिळाले आहे. त्यामुळे पावसाच्या आधीच या नद्या गाळमुक्त होऊन, दरवर्षीच्या पुराच्या महासंकटाची टांगती तलवार तरी राहणार नाही. त्याचप्रमाणे गाळ उपसा केल्यानंतर त्या पाण्याचा सदुपयोग देखील ग्रामीण भागामध्ये करण्यात येऊ शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular