26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeKokanभर समुद्रात नौकेने घेतला पेट, स्थानिकांनी ८ जणांचे प्राण वाचवले

भर समुद्रात नौकेने घेतला पेट, स्थानिकांनी ८ जणांचे प्राण वाचवले

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी भर समुद्रात आपल्या नौकांसह धाव घेत नौकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

कोकणात मासेमारी हा परंपरागत व्यवसाय असून, अनेकांनी तो पिढीजात सुरु देखील ठेवला आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार मासेमारी केली जाते. या व्यवसायामुळे अनेक बांधव एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे गरजेच्या वेळी एकमेकांच्या मदतीला धावून देखील जातात.

देवगड येथील समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या ‘पुण्यश्री’ नावाच्या मच्छीमार नौकेने अचानक समुद्रातच पेट घेतल्याने, घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी भर समुद्रात आपल्या नौकांसह धाव घेत नौकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती स्थानिक सुरक्षा यंत्रणेला दिली. त्यानुसार पोलिस स्पीड बोट घटनास्थळाकडे रवाना झाली.

एका स्थानिक मच्छीमार नौकेला समुद्रात अचानक आग लागल्याची ही दुर्घटना सकाळच्या सुमारास घडली. पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नौकेतील आठ मच्छीमारांना सुखरूप दुसऱ्या मच्छीमार नौकेवर घेण्यात आले. आगीचे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही आहे.

रत्नागिरी येथील तटरक्षक दलाला कळवल्यानंतर बचावासाठी आणखी एक स्पीडबोट रवाना झाली. स्थानिक आणि पोलिस यंत्रणेने मदतकार्य केले. नौकेवर आठ मच्छीमार होते. त्या सर्वांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीमध्ये नौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नौकेवरील काही मच्छीमारांना आगीमुळे किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ते सुखरूप असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी दिली आहे. नौकेचे नुकसान झाले तरी, त्या नौकेवरील आठ जणांचे प्राण सुखरुपपणे वाचल्याने, संबधित मच्छीमारांनी नि:श्वास सोडला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular