22.2 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeRatnagiriरंगकर्मींचे जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांसाठी निवेदन

रंगकर्मींचे जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांसाठी निवेदन

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना काळातील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी रंगकर्मी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनासाठी सिनेअभिनेते विजय पाटकर यांनी पुढाकार घेतला आहे त्याच बरोबर विजय राणे, संचित यादव, मेघा घाडगे, शितल माने यांचे सहकार्य आहे.

मागील दीड वर्षापासून सुरु झालेल्या कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता जशी भरडली गेली आहे, तशीच सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्वच मनोरंजन क्षेत्राला जोरदार फटका बसला आहे. ८०% रोजंदारीवर काम करणाऱ्या रंगकर्मी कलाकारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे. सांस्कृतिक मंडळे, नमन,खेळे,भजन,जाखडी नृत्य,इत्यादी लोककलाकार आणि त्या क्षेत्रातील वाद्यवृंद कलाकार, सिनेमा- मालिकातील कलाकार, पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ कलेच्या आधारावर असणाऱ्या अनेक अकॅडमी या सर्वांचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे.

कोरोना काळातील मागणीमध्ये कमी संख्येच्या कलांना सादरीकरणाचे परवानगी द्यावी. पूर्णवेळ कलेवरती आधारित असणाऱ्या रंगकर्मींच्या घरगुती प्रश्नांसंदर्भात भरभाडे,  वीज बील यामध्ये सवलत द्यावी तसेच   रंगकर्मी रोजगार हमी योजना सुरू करावी. त्याचबरोबर रंगकर्मीच्या कायमस्वरूपी मागणीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच रंगकर्मींची शासन दरबारी नोंद असावी, जेणेकरून, पेन्शन योजना लागू करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. अशा अनेक मागण्यांसाठी रत्नागिरीमध्ये राजकिरण दळी यांचा नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. आनंद आंबेकर ऍड. श्रीकांत भाटवडेकर, राजू किल्लेकर आशुतोष नाडकर्णी आदी रंगकर्मी आणि हितचिंतक उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा समन्वयाचे काम प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांनी पाहिले, तर मुंबईमधून विजय राणे यांनी त्यांना सदर आंदोलनासाठी प्रमुख मार्गदर्शन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular