कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि टीमने अटक केली होती. त्यामध्ये आर्यन खानकडे ड्रग्ज असल्याचा आरोप एनसीबीने लावला होता. या प्रकरणी सुनावणी झाल्यावर आर्यनला सेशन कोर्टाने एनसीबी कोठडी यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आर्यन खान आणि त्याच्या ३ मित्रांना कॉर्डेलिया क्रूझवरून अटक करण्यात आली होती. कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही क्रूझ मुंबई ते गोवा प्रवास करणार होती. परंतु यावर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमला होती. यामुळे वानखेडेंनी छापेमारी केली.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अडचणीत आला होता. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये आर्यन खानकडे प्राथमिक तपासात ड्रग्ज सापडले नसल्याची माहिती समोर आली आहे.
ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आर्यन खानवर एनसीबीने कारवाई केली होती, परंतू या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती, एनसीबीने स्थापन केलेल्या रिपोर्टमध्ये आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही. तसेच ड्रग्ज प्रकरणातल्या कटात आर्यन खान सहभागी नाही असे म्हटले गेले आहे.
एसआयटीने स्थापन केलेल्या रिपोर्टमध्ये आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही. तसेच ड्रग्ज प्रकरणातल्या कटामध्ये आर्यन खान सहभागी नाही. असे म्हटले आहे. त्यामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एनसीबीकडून एसआयटी रिपोर्टचे खंडन करण्यात आले असून, सदरच्या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. त्या आधी कोणतीही प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल, असे एनसीबी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.