30 C
Ratnagiri
Sunday, February 1, 2026

आंगणेवाडीत जत्रोत्सवाची लगबग उत्सव ९ फेब्रुवारीला

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि दक्षिण कोकणचे 'प्रती...

महानगर कंपनी’वर कारवाईचे संकेत…

महानगर गॅस कंपनीने शहरात केलेल्या खोदकामाचा मुद्दा...

रत्नागिरी न.प.च्या पहिल्याच सभेत सत्ताधारी नगरसेवक आक्रमक

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच...
HomeDapoliबापरे! पोलिसांची धडक कारवाई दापोलीजवळ तब्बल ७० बॉम्ब जप्त

बापरे! पोलिसांची धडक कारवाई दापोलीजवळ तब्बल ७० बॉम्ब जप्त

एकूण २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तब्बल ७० जीवंत गावठी बॉम्ब जप्त करत एका इसमाला अटक केली आहे. बेकायदेशीर स्फोटक पदार्थ विरोधात पोलिसांच्यावतीने अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना खेड-मंडणगड रस्त्यावर मौजे मुरगज येथे सायंकाळी सुमारे ५.२५ वाजता संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान सदर इसमाचे नाव प्रकाश राम जगताप (वय ३३), रा. शिरसाळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररित्या बाळगलेले ७० जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराबाबत आरोपीविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५/२०२६ अन्वये भारतीय स्फोटक कायदा १९०८ कलम ५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाणे करीत आहे. स्फोटक बेकायदेशीर माहिती पदार्थांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे. ही कारवाई कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महाजन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील श्रेणी पो. उपनि. प्रशांत बोरकर, पो. हवा./९०९ विजय आंबेकर, पो. हवा./२६५ योगेश नांदकर, पो. हवा./१४०७ दिपक पाटील, पो. हवा./१४१० सत्यजित देवरकर, चा.पो.शी./२१५ अतुल कांबळे यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular