24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraअखेर आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा

अखेर आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा

महापूजेचं निमंत्रण देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष व सदस्य आमंत्रण देण्यासाठी विणा, विठ्ठल रखुमाईंचा फोटो, तुलसीमाळा आणि टोपी घेवून मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले.

१० जुलैला आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा केली जाणार आहे. राजकीय घडामोडीनंतर भाजपच्या पाठींब्याने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यंमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे सरकार आता पूर्ण बहुमताच्या भरवशावर जोमाने कामाला लागले आहे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती. आता या पूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. महापूजेचं निमंत्रण देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष व सदस्य आमंत्रण देण्यासाठी विणा, विठ्ठल रखुमाईंचा फोटो, तुलसीमाळा आणि टोपी घेवून मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या घरात आजही मोठ्या श्रद्धेनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो अजूनही तसाच आहे. कोणत्याही शिवसैनिकाच्या घरात गेल्यावर हे दृश्य नेहमीचेच आहे, याला एकनाथ शिंदे सुद्धा अपवाद ठरले नाही.

विशेष म्हणजे, आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय पूजेचा मान हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. तर भाजप शिवसेना युती दरम्यान हा मान देवेंद्र फडणवीसांना मिळाला आहे. पण यावर्षीची होणारी शासकीय महापूजा विशेष असून पहिल्यादाच राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही पूजा करणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणातही उद्धव ठाकरे यांनी वारकरी आपणास महापूजेला येण्याबाबत विचारणा करत असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापूजेचे निमंत्रण दिले होते.

RELATED ARTICLES

Most Popular