चिपळूण शहरातील वेस मारुती मंदिर ते शिवनदी पुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कितपत योग्य पद्धतीने केले गेले, हे चिपळूणकर नागरीकांना दिसुन आलेच आहे. सदरील रस्त्याचे काम हे शिवनदी पुलापासून एकवीरा मंदिर परिसर, वडनाका, बापटआळी, कन्या शाळा, श्रीदेव जुना काळभैरव मंदीर परिसर ते श्रीदेव नविन काळभैरव मंदिरापर्यंत व तेथुन वेस मारूती मंदिर भागात हा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु सध्याची अवस्था पाहता रस्त्याच्या वरील डांबर पूर्णपणे गायब झाल्याचे दिसून येत आहे. तसेच वेस मारुती मंदिर परिसर ते लोकमान्य टिळक वाचनालय पर्यंत रस्ता देखील याचप्रकारे झाल्याचे दिसत आहे.
चिपळूण नगरपरिषद बांधकाम विभागाने संबंधित कामाच्या ठेकेदारास योग्य ती कारवाई करून काळ्या यादीत टाकायची तयारी कागदोपत्री दाखवली. गेली तरी त्या ठेकेदारास योग्य रित्या काळ्या रंगाची डांबर कशी असते? हे. दाखून देऊच, जर त्या ठेकेदाराने रस्ता पुन्हा योग्य पद्धतीने डांबरीकरण केले नाही, तर चिपळूण नगरपरिषद भागात त्याला यापुढे काम देखील करुन देणार नाही. अशाच काही निकृष्ट ठेकेदारामुळे शहरातील अनेक रस्त्याची वाताहत झाली असल्याचे शहरात देखिल दिसून येत आहे. त्यात प्रामुख्याने श्री स्वामी समर्थ मठ ते बहादुर शेखनाक्यास जोडणारा रस्ता
रॉयल नगर येथील नारायण तलावा समोरील अतिथी हॉटेल शेजारील नूतन केलेल्या रस्त्याची डांबर देखिल गायब झाल्याचे दिसून येत आहेत. या रस्त्याच्या कामाकरीता करोडो रुपये चिपळूण नगर परिषदने खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे. सदरील रस्त्याच्या ठेकेदाराना प्रशासनाने त्याच्या ठरलेल्या मुदतीत तातडीने पुन्हा काम करण्याचे आदेश देण्यात यावेत, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची बिल अदा करू नयेत. जर स्थानिकानी मागणी केल्या गेलेल्या बाबीची चिपळूण नगरपरिषदेच्यावतीने गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर चिपळूण नगर परिषदेच्या बांधकाम विभागास सर्वस्वी जबाबदार असल्याचे चिपळूण शहर शिवसेना उपशहरप्रमूख सचिन शेट्ये यांनी ईशारा दिला आहे.