26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriहातखंबा तिठानजीक वेंगुर्ल्याच्या दोघांना ९ जिवंत गावठी बॉम्बसह ताब्यात

हातखंबा तिठानजीक वेंगुर्ल्याच्या दोघांना ९ जिवंत गावठी बॉम्बसह ताब्यात

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे ९ जीवंत गावठी बॉम्‍ब पकडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला शनिवारी सायंकाळी दोन तरूण गावठी हातबॉम्ब घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने हातखंबा तिठा येथे सापळा रचला होता. शनिवारी सायंकाळी ७.३० वा. सुमारास या पथकाला पालीहून रत्नागिरीच्या दिशेने येणार्‍या दुचाकीवरील दोघांचे वर्तणूक संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्यांची दुचाकी थांबवली. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांच्याजवळ ९ जिवंत गावठी बॉम्ब या पथकाला मिळून आले.

हातखंबा तिठानजीक रत्नागिरीत येणार्‍या वेंगुर्ल्याच्या दोघांना ९ जिवंत गावठी बॉम्बसह दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. दहशतवाद विरोधी पथकाने या दोघांनाही कसोसीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. ग्रामीण पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

रामा सुरेश पालयेकर  रा.वरचा वडखोल, वेंगुर्ला आणि श्रीकृष्ण केशव हदळणकर  रा. वेंगुर्ला अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिस हेड काँस्टेबल उदय चांदणे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे येथे ३ सप्टेंबर २०२१ रोजी म्हणजेच ऐन गणेशोत्सवात दहशतवाद विरोधी पथकाला १६२ गावठी बॉम्ब सापडले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती.

पोलिसही या घटनेने चक्रावून गेले होते. ते बॉम्ब डिस्पोजल पथकाने निकामी केले होते. यावेळी मध्यप्रदेशच्या ४८ वर्षे व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. सुरेश किर्वे अस त्याच नाव होतं. त्यानंतर आता मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे ९ जीवंत गावठी बॉम्‍ब पकडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हे बॉम्ब घेउन रत्नागिरीत येणार्‍या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular